पान:मजूर.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
मजूर

नही चेहरा, त्यांनीं मार्गे वळुन पाहिलें तरी दिसूं नये म्हणून हातांत वर्त- मानपत्र घेऊन वाचीत असल्याचा बहाणा केला होता !
 " साहेब ! आजच म्हणजे आजच्याच तारखेला रात्री नऊ वाजतां ! मोठे- छोटे शेट बोलत असतां मी ऐकलें, म्हणूनच तडक तुमच्याकडे दादरला आलों - आजच तुमच्याकडे मी आलों ना ? आजच दादरहून आपण दोघे शेटजींच्या बंगल्यावर संनुगम आणि छोटे-मोठे शेट काय बोलतात - संवरतात, हें ऐकण्याकरितां निघालों आहात ना ? मग झालें तर, मग ती मुलाखत आजच ठरली आहे तर ! " बॉयन सांगितलें.
 ट्रॅम शवटच्या स्टेशनवर थांबली ! मंडळी उतरून ट्रॅम खालीं झाली मॅनेजर बॉय पुढच्या पुढे उतरले. संतू दादा, मागच्य मागें उतरला ! मॅनजरचा व बॉयचा संवाद दादाच्या डोक्यांत सर्व उतरला होता ! त्याचे धागेदोरे दादा झटपट आपल्या डोक्यांत जुळवत होता ! मॅने जरचे आपल्या विरुद्ध कांही तरी जबरदस्त प्लॉट चालले असावेत, यांत तर दादाला शंकाच राहिली नाहीं. पण त्या विचाराला जास्त अवसर द्यायला दादाच्या डोक्यास या वेळीं तितका वेळ नव्हता. व त्याच्या तूर्तास तरी महत्त्व वाटलें नाहीं. ट्रॅममधून उतरतांच शेटजींच्या बंगल्य कडे मॅनेजर व बॉय सरळ निघाले. दादा मधल्याच बोळानें झट. कन घुमून त्यांच्या पुढे झाला. दादाला त्याच्या अगोदर बंगल्यावर पोचणें भाग होतें. शिवाय मध्येच ट्रॅम थांबल्यामुळे आतां मध्यंतरी थांबा- यला वेळही नव्हता. नत्राला ११२ मिनिटें कमी असतील. दादा तीरा सारखा निघाला. शेटजींच्या बंगल्याच्या आसपास, दोनतीन मजुरांच्या लहान लहान टोळ्या दादाला दिसल्या. दादाजवळ येतांच ती मंडळी पुढें आली. दादाला एकदम आश्चर्य वाटलें ! त्याने मंडळींना ओळखलें. त्य नें " कां आलांत ? " म्हणून विचारलें. त्यांनी सांगितलें. संपाचा निकल ऐकायला ! सर्वाच्या अगोदर संपाचा शेवट कळला पाहिजे आणि आमच्याकडून सगळ्या आपल्या गरीब मजूर भावांना आनंदाची बतमी कळली पाहिजे, म्हणून आलों आहोत ! " यावर 'बरें तर, तुमच्याप्रमाणें आपले मॅनेजर देखील संपाचा निकाल ऐकायला येताहेत !"