पान:मजूर.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
मजूर

 "ह्यास्नी का भ्यायचं हाय ! ” चवथ्या मजुराने पहिल्याला दुजोरा दिला.
 " हो आपून एकच नव्हका ! आपल्यापक्षी चार बुकें शिकल्याती, वाईच यस् पयस्करत्याती, हातं असलं हांजी, ह्ये असलं साहेबी स्वांग आणत्याती, च्यावर जाऊं नगस. आपल्यावाणी आपल्या देशावर जात्याती कनाय, तवा भरल्यावाणीच शेतामंदी नांगूर धरत्याती - कूळ- . वकाठी करत्याती-मोटा धरत्याती-माळ्यावर बसून गोफणीनें शेता- वरची पाखरें बी हाकत्याती ! - न्हायव साह्येब ?" आणखी एका मजु- रानें माहिती दिली.
 मॅनेजरची मात्रा इथें आतां मुळींच चालण्यासारखी नव्हती ! यांच्या तावडीतून सुटावें कसें या घोरांत तो होता ? मनांतल्यामनांत गांगरून गेल्याने, त्यांच्या तोंडांतून एक शब्दही फुटेना !
 "अरे, ह्यो सायेब बिडीमाचिस बी दीना ! बोलना बी ! ” ज्या मजुरानें मॅनेजरच्या हाताला धरून जागच्याजागीं डांबून ठेवले होतें, तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला-
 " जाऊं द्या. द्या सोडून, दारूपाणी करून झिंगलाबिंगला असेल- जाऊं द्या त्येला त्याच्या वाटेनें ! " एका मजुराने दुसऱ्याकडे डोळे मिच- कावून कींव दाखविली !
 " अं ? जाऊं द्या ! मोठा बाजीरावच पडलास का नाहीं ? जाऊं द्या म्हनं ! बिडीशिगरट घेतल्या बगार जाऊं द्या कुठें ? - साह्येबा, काड आम्हां समद्यास्नी एकेक बिडी न्हाईतर शिगरट ! अन् जा गुमान आपल्या वाटेनें ! कोण तुझ्या आंगाला धक्का लावीत नाहीं बघ ! लावला तर माझं नांव सांग ! मला ये विचाराला ! " दुसरा एक मजूर पुढे येऊन सावाचा आव आणून म्हणाला !
 "देईल ! देईल! ना द्याला का झालं! असं सरळ्याखालीं मागून घ्या कीं ! विडी द्याला कां साहेब न्हायानतुया का ? का तुम्हीं तरी त्येला त्येच्या खिशांतले पैसे मागतायसा ! दे, सायबा दे बिडी अन् हो चालता ! ह्ये कांहीं कुनी च्वार नव्हत ! आपले गरीब गिरणबाबू हायती ! घरांत खायला प्यायला न्हाय म्हणून समिंद्राची हावा खायला मजेनें फिरत्याती!