पान:मजूर.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वे.

१२९

बायको अन् माझी धनीन होणार- झाली तर संतुरामाच्या बहिणी इतकी सुख देईल का नाहीं मला, हें कांहीं आतां सांगतां यायचें नाहीं ! - पण तिच्या बद्दलही मला अजून शंकाच आहे ! "
 “ कां ? शंका कसली लेका ? " मॅनेजर बॉयच्या तोंडाकडे क्रुद्ध दृष्टीनें पाहूं लागला !
 " शंका म्हणजे अशी, तुमचें शेटजींच्या जवळचें वजन कमी झालें आहे, असें तुम्हींच म्हणतां तुम्ही संप होऊं दिला नसता कीं नाहीं, नाहीं तर आतांपर्यंत संप मोडला असता तुम्हीं तर मग शेटजीवर तुमचें वजन बसलें असतें - कमी झालेलें बसलें असतें ! तसें तर कांही अजून झालें नाहीं. शिवाय दुसरी गोष्ट, शेटजींची ती उडाणटप्पू पोर - त्या आपल्या संतुरामाच्या - मजुराच्या नादी लागली आहे !! तुम्हांला माहि- तच आहे ! तेव्हां म्हणतों, जर शेटजींच्या पोरीनें, तुम्हांला ढकलून त्या संतूला माळ घातली, तर मग मी काय करूं ? तुम्हाला बायको नाहीं, मला मालकीण नाहीं ! असें व्हायचें म्हणून मी बघा काळजीत आहे; दुसरें कांहीं नाहीं ! नाहीं तर साहेब, असें करा ना ? त्या दोन्हीं पोरींचा नाद द्या सोडून. तिसरीच बघा एकादी ! तुमच्या सारख्याला या मुंबईत बायकांना काय तोटा गेला आहे हो ? "
 "पोया, माझ्या संगतीला राहून बराच हुशार झाला आहेस कीं ! शाबास ! चांगला होशल पुढें ! पण मोठा झाल्यावर त्या संतू सारखे शिंगशेपूट फुटू देऊ नकोस समजलास ! माझे उपकार ध्यानांत राखून माझ्याशीं वागत जा ! माझ्या बायकोची तुझ्या धनिनीची तूं काळजी करूं नकोस ! बधूं या की शेटजींच्या बंगल्यावर आज काय फार्स उडतो आहे तो ! रागरंग तर पाहूं ! मग तुला उद्यां सांगेन ! आजच पण संतूची शेटजींची भेट ठरली आहे ना अतां नऊ वाजतां ! लेका एवढें तरी आज ध्यानांत राखून मला येऊन सांगितलेंस हें बरें केलेंस !" - मॅनेजर उद्गारला. रात्रींच्या शांत वेळीं, व वर कोणी जास्त नसल्यामुळे, दादाला अक्षरन् अक्षर ऐकायला आलें ! बोलण्याच्या भरांत मॅनेजर किंवा बॉय यांनी एकदांही मागे वळून पाहिलें नाहीं, व संतुदादाने ही आपला चुकू-
 म... ९