पान:मजूर.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
मजूर

 तर काय गाढवा ? " खेकसून मॅनेजरने विचारलें.
 तुम्हीं संतूरामापेक्षां किती तरी मोठे आणि कित्येक वर्षांचे मोठे आहांत ! तुमच्या आईच्या वेळेला, त्याच्यापेक्षां नाहीं का जास्त लोक जमणार ? जमलेच पाहिजेत ! माझी खात्री अ हे ! "
बॉयच्या या बोलण्यापुढे मॅनेजर काय रडणार? त्याची अक्कलच तितकी त्याला त्यानें काय करावें ? पोऱ्या कांहीं का बोलेना, पण त्याला आपल्या बद्दल खराखरा अभिमान आहे, याबद्दलच मॅनेजरला जास्त वाटलें ! "असें गध्यासारखें बोलूं नये. अक्कल अशी पाजळू नये" एवढेच म्हणून मॅने- जरनें त्याचें तोंड बंद केलें. बॉय काय बोलला हें जर कळून मुद्दाम जर बोलला असतां तर मॅनेजरसारख्या क्रूर माणसानें बॉयला चालत्या गार्डीतून फेंकून दिलें असतें !
 आणखी जरा वेळ गेला. बॉयला बोलण्याची पुन्हां हुक्की आली.
 “साहेब,” तो म्हणाला, “मला तर काळजीच पडून राहिली आहे?” कशाची रे? " मॅनेजरनें विचारलें, मॅनेजरचा हा बॉय फार-फार आवडता होता. कारण खालच्या जातींतला असला तरी हुषार होता — मॅनेजरचा हरकाम्या होता. मॅनेजरच्या सगळ्या आर्डरी हा बिनबोभाट अमलांत आणित असे, मॅनेजरला  लागणारे मद्य मटन मासे - नेहमीं याच बॉयच्या आंतल्या खिशांतून मॅनेजरने दाखविलेल्या गुप्त ठिकाणी येऊन पडत असे. शिवाय कधीं या कानाची दाद त्या कानाला बॉयच्या कडून लागायची नाहीं. मग कां नाहीं मॅनेजर बॉयवर खूष असणार ? कां नाहीं बॉयचा एकादा अधिकउणा शब्द ऐकून घेणार ? कां नाहीं तो मॅनेजरचा आवडता असणार ? " कशाचीरे काळजी एवढी पडली आहे तुला ? असा लब्धप्रतिष्ठितासारखा विचारतो आहेस तो ? " मॅनेजरनें पुन्हा बॉयला प्रश्न केला !
 "साहेब, संतुरामाची बहिण तर तुम्हांला मिळत नाहींच म्हणतां ! चांग- ली होती हो तुम्हांला बायको, अनू तुमच्यापेक्षां मला धनीन चांगली शोभली असती बघा! शिवाय तिच्या हातांखाली मला सुख लागलें असतें. ती गरीब ! मी गरीब ! साहेब, गरीबच गरीबांचे दुःख अन् हाल जाणतात बघा ! दुसऱ्या चें काम नव्हे तें ! आतां तुम्हीं म्हणता शेटजींची मोटार उडविणारी पोरगी तुमची