पान:मजूर.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वै.

१२७

पण काय झालें हें सांगितलेंस का ? " मॅनेजरनें पोऱ्याची अक्कल बाहेर काढली. ट्रॅमची लाईन कांहीं घोटाळ्याने ब्लॉक झाली होती. ट्रॅम अजून जागच्याजागीच उभी होती !
 " साहेब, त्यांचं इतकें अवघड पक्कड बोलणें मला कळतें, तर असा तुमची खेटरें खात कशाला तुमच्याजवळ राहिलों असतों ! तुमच्या सार- खाच एखाद्या गिरणीचा मॅनजर होऊन नसतों का तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसों ! " बॉय बोलला. बॉयनं तोंड चुकविलें नसतें, तर त्याचें आतां थोबाडच रंगलें असतें ! मॅनेजरला राग आलासा पाहून बॉय दुस- रेंच बोलूं लागला !-
 " साहेब, सं रामाची आई तेरवाच्या दिवशीं इथेंच मेली ! "
 " चांगलें झालें ! " खुशालचंद कपाळाला आठ्या घालून म्हणाला !
 "मग साहेब, तुम्हीं केव्हां मरणार? "बॉय बोलला, पण यावेळीं त्याचें मुस्कट खरोखरच फुटले ! दादा दुरून पहात होता. कंडक्टरचे किंवा दुसऱ्या कोणाचें -- त्यांच्याकडे फारसं लक्ष नव्हते. - काय असायचें कारण ?
 “ स हेब,” लाल झालेला गाल चोळीत बॉय म्हणाला, “हें हो काय साहेब, संगमाच्या आईचें चांगलें झालें म्हणून तुम्ही म्हणाला. म्हणून मी तुम्हांला म्हटलें, तुमचें तसें कधीं चांगलें व्हायचें ! तुमचें चांगलें व्हावें अस मला वाटतें ! तुमचें चांगलं चिंतलं तरी तुम्ही आमचें थोबाड फोडतांच-न्याय झाला कीं नाहीं ? "
 ठण् उण् उण् उण्, करत ट्रॅम सुरू झाली !
 "संतूरामाच्या आईला न्यायला खूप खूप गर्दी झाली होती साहेब ! हजार दान हजार मजूर आले असतील पहा! "बॉयची चर्पटपंजरी मुस्कटांत खाऊनही चालूच होती !
 " असेल, झाली असेल, तुला काय करावयाचें आहे ? " मॅनेजरनें तुच्छता दर्शवली !
 " तसे नव्हे स. हेच ! चार दिवसांत पुढे आलेल्या संतुरामाच्या आईला न्यायला जर इतकी गर्दी जमली तर " बॉय इतकेंच बोलून मॅनजरकडे पाहू लागला.