पान:मजूर.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
मजूर

केव्हां येणार आहे ? दिवाळीला येईल ना ? नाहीं तर आपणच जाऊं या तिच्याकडे ! " असं कांहीं तरी विचारून पाणी पाडी !! असो.
 दादाला आज शेट इच्छारामभाईंच्या मुलाखतीला जायचें होतें. मुलाखतीची वेळ रात्रीं नवाची निश्चित झाली होती. शेटजींच्याकडून ' संपाचा शेवट ' कधीं आणि कसा लागावयाचा आहे, याचा अंदाज लागण्याचा भरवसा असून अधीर झालेल्या मजुरांना त्यानें तसें सांगित- लेही होतें.
 आठ वाजतां मजूरमंडळांतून दादा परत आला. मी खायचें तयार करून ठेवलें होतें, तें कस बसें खाल्लें. आणि विन्हाडाच्या बाहेर बरोबर साडेआठला दादा निघाला. ट्रॅमने शेटजींच्या बंगल्यावर जायला स पंचवीस तरी मिनिटे लागतच ! त्या बेतानें दादा निघाला ! एक दुमजली ट्रॅम आली ! दादा सरळ वर गेला. खालीं गरदी होती. वर कोणी तितकेसे नव्हते ! पाठीमागच्या सीटवर दादा बसरा ! त्याच्याच पुढें दोन तीन सीटस् सोडून दोन माणसें दादाच्या दृष्टीस पडली. दादाच्या कानावर ओळखीचा आवाज पडला म्हणून दादाने तंद्रेतून जागृत होऊन निरखून पाहिलें, तो दादाला आपला मॅनेजर खुशालचंद, आणि त्याचा बॉय असल्याचे आढळून आलें. दादाला अगोदर कोणाशी ओळख काढून लोचटपणा करण्याची संवय नव्हती. आणि आतां तो मॅनेजरला भेटला असतां तरी त्याला काय त्याचें बरें वाटलें असतें ? तसें बाह्यतः सुद्धां रहस्य राहिलें नव्हतें. भेट झालीच असती तर एकादवेळ खात्रीने कांहीं तरी तोंडातोंडीच व्हायची ! दादानें बाहेर तोंड काढून दुसरीकडे लक्ष गुंतविण्याचा प्रयत्न केला ! ट्रॅम पुढे निवाली तसे जेरमहालाकडे बोट दाखवून बॉय म्हणाला, "साहेब, आपला संतूराम येथे राहतों ! तुम्हीं सांगितलें त्या दिवशीं मी मोटारीच्या मागून येऊन येथे किती तरी वेळ होतों ! "
 " होतास खरा पण गड्या, त्याचा उपयोग काय ? तिथे काय झाले ? मंडळी काय बोलली, हें कुठें तूं सांगितलेंस ? " "पुष्कळ बोलणे झाले म्हणून नाहीं का साहेब सांगितलं तुम्हांला !" बॉय उत्तरला !
 हत् मूर्खा ! गद्धा म्हणतो तो उगीच का ? पुष्कळ बोलणें झालें -