पान:मजूर.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वें.

१२५.

मोठ्यांचे-गिरणीवाल्यांचे डोळे उघडावयाचेच होते ! आमच्या घरीं आमची आई मेली ! मजूर वेळेला धाऊन आले ! असे मजूरांच्या घरी दररोज कुठेंना कुठे तरी प्रसंग होतेच ! एकाद्याची आई, एकाद्याचें मूल एकाद्याची बायको, तर एकाद्याची भाऊ-बहिण- पोटाला नाहीं म्हणून अन्नान करून प्राण टाकीत. दादा त्याही अनाथ अपंगांची जाऊन व्यवस्था लावी ! असें चाललें होतें !
 दादा याच मजूरांच्या सेवेंत आपला अष्टौप्रहर असला काळ कंठींत होता. एकसारखा आपल्या मनाला गुंतवीत होता. रात्रीं घरीं आल्यावर दमला भागलेला जीव जमिनीवर आंग टाकतांच झोप त्याच्यावर झडप घाली ! दादाला यावेळीं आईविषयीं विचार करावयाला किंवा मनमुक्त रडायला सुद्धां फुरसद नव्हती !
 आईला आज तीन दिवस होऊन गेले होते ! त्या दिवशीं जरी दादा येईन म्हणाला होता, तरी शेटजींच्याकडून त्याला बोलावणे आलें नाहीं. बबूताई या दोन दिवसांत दिवसाचा सारा वेळ माझ्याकडेच काढीत होती. एकादे वेळ ती जेवायला देखील परत जायची नाहीं. मी जेवणार नाहीं, तशीच एकटी असले म्हणजे आईची आठवण काढून रडत बसेन.. म्हणून कांहीं तरी इकडल्या तिकडल्या हजार गोष्टी काढून माझ्या मनाला विरंगुळा होईल असें करी ! आपल्या घरूनच कांहीं तरी खायला करून आणी. मला घाली. मी एकटी खाणार नाहीं म्हणून आपण मजबरोबर खाई ! रत्नु तर आतांशा बबूताईची पाठ सोडीत नसे ! बबूताई त्याच्या- बरोबर खेळे ! शक्य तितकी आईची आठवण त्याला कशी न होईल, याची ती सावधगिरी बाळगीत असे. कांहीं तरी केलें, कांहीं तरी खेळायला दिलें. गॅलरींत उभे राहून हंसायला येण्यासारखें दिसले, म्हणजे बबूता- ईनें रत्नुला दाखवावें. तो हंसला म्हणजे मला हांक मारावी. त्याच्या हंसण्यानें मी हंसावे. अगी तिची इच्छा असे ! कधीं सफल होई, कधीं सफल होतही नसे ! बबूताईच्या या सान्या आटोकाट प्रयत्नावर मधूनच 'ताई, आपली आई कुठे ग गेली आहे ? गांवाला का ? मला कांगेली ? मी तिच्या अंगावर लोळून लास टाकून देईन म्हणून ? आतां