पान:मजूर.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वें.
मॅनेजरची मजा !

 संप चालूच होता. गिरणीवाल्यांचा निकाल बाहेर पडावयाचा होता. संपवाले अगदी टेकीस आले होते ! संपवाल्यांना थोपवितांथोपवितां दादा बेजार होऊन गेला होता ! संपवाल्यांना थोपवावें, त्यांची समजूत काढावी, धीर द्यावा. कोणाची देशावर जाण्यासारखी स्थिती असली तर त्याला रवाना करावें. जे धनिक, उदारधी, मजुरांविषयीं सहानुभूति बाळ- गणारे असतील, त्यांच्याकडे हेलपाटे एकाच्याऐवजीं दहा घालून मजु रांच्या पोटासाठी झोळी खांद्यावर घेऊन दादानें हिंडावें, आपल्याच- प्रमाणे आणखी कांहीं उत्साही, होतकरू तरुणांना गरीब - अन्नान्नगत मजुरासाठी घरोघर 'जनी रामसेवा । वनीं रामसेवा' असले समर्थांचे श्लोक म्हणावयाला शिकवून, मिळेल तें आणावयाला लावावें. कोणी कांहीं बोललें, उपहास केला, एकाद्या अरेराव्याने दारीं गेलें असतां रट्ट्याला धरून खेचून कांहीं न घालतां हांकून लावलें, तरी त्याचा विषाद मानूं नये ! खेद वाटू देऊं नये. ' ईश्वर आपल्याला सद्बुद्धि देवो ! ' असा त्यालाच आशिर्वाद देत, पुढलें घर पहावें, अशा रीतीनें दादानें संपवाल्या मजुरासाठीं अहोरात्र श्रम सायास चालविले होते ! एकादे- वेळ संपवाले दादावरच चिडत. त्यांचें समजुतीचें बोलणें ऐकून घेत नसत. ' थोडा दम धरा, जरा कळ काढा' असें दादा सांगायला गेला तर कित्येक बुद्ध, कोपिष्ट, भुकेनें भडकलेले मजूर दादाच्याच अंगावर यंत ! एक दोघांनीं तर दादाच्याच अंगावर हात उचलले होते. दादाच्या पाठींत दुखापत देखील झाली होती ! तरीपण दादा धीमेपणाने स्वकर्तव्य बजावत होताच ! आमच्यावर जो प्रसंग, तोच सर्वांवर होता. जो सर्वो- वर तोच आमच्यावर होता. आमच्या घरीं आज-उद्यांची पंचाईत होती! तीच अवस्था हजारो मजुरांची होती ! मजूरच मजूरांच्या सहाय्याला धावत होते - मजुरच मजुरांना धीर देत होते ! तरी अजून धनिकांचे-