पान:मजूर.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १२ वें.

१२३

थोडें थोडें बसून खाल्लें ! दादा व मी शक्य तितकें मनाला आवर घालीत होतों !
 दादानें सजीवर अंग टाकले. मीही अर्थवट वळकटी उलगडून कलंडलें ! आज आईच्या जागी आई नमन 'दिवा' तेवत होता ! त्याकडे डोळे पहात होते ! मन दिनदुनियेत मोकाट भटकत होतें ! दादाच्या मनाची स्थिति त्याचा तोच जाणें !