पान:मजूर.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
मजूर

दीड हजारावर असेल ! आईला उचलतांना मी ओक्साबोक्सी रडायला लागलें. बबूताईच्या गळ्याला मिठी घातली. "ताई; गेली ना ग आई ? आई, आई. कुठे निघालीस तूं ? पुन्हां नाहींना दृष्टीला पडायचीस ! पुन्हां आम्हांला तूं भेटायला यायची नाहीस ना ? - आई, कां ग अशी आम्हांवर इतकी निष्ठुर झालीस ? "
 स्वतः रडत होती. मला रडूं नको म्हणून समजावत होती ! झालें, आई गेली. आमच्या जागेंत आम्हांला जाववेना. तिकडे बघवेना. पण गेल्याशिवाय कांहींच सोय नव्हती ! आईच्या प्राणविसर्जनाच्या जागेवर दिवा ठेवायचा होता ! बहुत त्या दिवशीं संध्याकाळ पर्यंत आमच्याकडे राहिली होती ! स्मशन यांत्रेहून दादा परत आला. बबूताईनें आम्हां सगळ्यांना पाणी तापवून घातलें. संध्याकाळीं परत जातांना रत्नुला आणि मला आपल्याकडेच चलायला आग्रह करूं लागली. पण तसे करणें आज शक्य नव्हतें आणि इष्टही नव्हतें ! रत्नू त्या दिवशी दत्तासाहेबांच्या मंडळींतच राहिला ! परत आल्यावर दादानें बबूताईला दोन दिवस कां आली नव्हतीस - आज कशी आलीस ?' वगैरे विचारतांना, तिनेही सांगायचे ते सांगितले. आणखी गतीं बाबांनों तुला भेटायला बोलायलें होतें म्हणून मी सांगायला आलें होतें. संपाचा निकाल लवकरच आणि उभयपक्षीं बहुतकरून समाधानकारक लागेल, असे त्यांच्या बोलण्यावरून दिसले. पण तुझ्याकडून एकदां मजुरांची बाजू नीट सम- जावून घ्यायची आहे - लेखी अर्जात खरेखोटे, जास्तीकमी असण्याचा संभव असतो, वगैरे ते म्हणत होतें ! पण-पण आज आतां शक्यच नाहीं. मी बाबांना सांगेन की आज बोलावणे पाठवूं नका म्हणून !" त्यावर दादानं सांगितलें, " कां ? पाठवू दे. भी अवश्य येईन. जे व्हायचें तें होऊन गेलें ! त्याच्याकरितां थांबायचं कशाला आतां ? जे हजारो मजूर माझ्या आईच्या प्रेतयात्रेला आले-त्यांच्या पोटाच्या प्रश्नाच्या वेळीं मी काय म्हणून दिरंगाई करीन ? रात्रीं अवश्य अवश्य येईन !"
 'बरें' म्हणून, पण मी व रत्नु तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्याकडे गेलों नाहीं म्हणून खिन्न व उदास मन नें ती परत गेली !
 रात्रीं रत्नु खालीच जेवला, मी व दादानें-वर तादें आणलीं- तिथेंच