पान:मजूर.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १२ वे

१२१

"बबूताई, आई आपल्याला टाकून गेली बरें, टाकून गेली !” बबूताई मटकन खालीं बसलीं ! आम्हीं गळ्यांत गळा घालून किती रडलों - किती वेळ रडलों. याची दाद कुणाला? दादा येईपर्यंत रडतच होतों ! आमच्याबरोबर रत्नुनेही आक्रोश केला !
 " माझी जन्म देणारी आई मेली त्यावेळीं मी अगदींच - पाळण्यांत होतें. त्यावेळी माझें आईच्या मृत्यूच्या दुःखाने रडायचें राहिलें होतें! तें या आईनें- रडायला लावलें !
 बनूताईला आमच्या आईचा किती अल्प काळांत लळा लागला होता! बिचारी तिच्याशीं कधीं एक ददुसऱ्या शब्दापेक्षां जास्त बोलली नव्हती; की कधीं आपल्या हातानें आईनें बबूताईला खायला जेवावयाला घातलें नव्हतें ! पण माझ्या आईवर आपल्या आईसारखें तिचें प्रेम ! दुसऱ्याच्या दुःखानीचा चटका लागणारी बबूताईसारखी माणसे किती तरी विरळा ! बताई किती हळहळली ! " मला जर कळलें असतें, कुणी नुसतां टेलिफोन दिला असतां तरी हजार कामे बाजूला सारून आई करितां आलें असतें ! शेवटची आईला पाह्यची माझी इच्छा पुरी झाली नाही. माझीच पुण्याई तितकी सबळ नव्हती त्याला कोण काय करणार ?” असे म्हणून आपल्याच कमनशीबाला ताईनें दोष दिला.
 दादा आला. बबूताईला अशा वेळी अशा स्थितीत पाहून त्याला डोळे पुसायला लागल्या खेरीज राहिलें नाहीं. पुन्हां आम्हीं मनमुराद डोळ्यां- तून पाणी गाळले. दादाचे डोळे लालबुंद झाले होते. जणूं कांहीं त्याच्या डोळ्यांतून आतां रक्ताचे थेंब पडताहेत ! दादाबरोबर माणसे बरीच आली होती. एकदोन करतां करतां कितीतरी माणसे झाली. पण हे सर्व मजूर होते. संपांत सांपडलेले — कामावरून घरीं राहिलेले सगळे मजूर होते !
 तयारी झाली ! आईला खालीं नेण्यांत आलें ! मी, बबुताई, वर गॅलरींतच उभ्या राहिलों होतों. आईला नेतांना रत्नु आरडून ओरडून गोंधळ करील—म्हणून खालीं दत्तासाहेबांच्या मंडळींत त्याला नेऊन सोडला होता.
 आईची प्रेत यात्रा निघाली ! प्रेत यात्रेला मजुरांचा जमाव हजार