पान:मजूर.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
मजूर

पाहिले. मी बोलेना म्हणून रत्नु हिरमुसलेला दिसला. मी त्याला ओढून जवळ घेतला. तेव्हां त्याला बरें वाटलें !
 कांहीं वेळ मध्ये गेला ! रत्नुनें, माझ्या हनवटीला एका हातानें धरून आणि मला खालीं आपल्याकडे पहावयाला लावून विचारले, "ताई, दादा, -- तूं मी मघाशी रडत ग कां होतों?"
 काय उत्तर देऊं ? रत्नुच्या रडूं आणणाऱ्या प्रश्नाला माझ्या डोळ्यां- तील पाण्यानं उत्तर दिलें ! पुन्हां घटकाभर माझें रडूं मला थांबवितां आलें नाहीं. मी उत्तर न देतां रडायलाच लागलेले पाहून 'आपणच कांहीं चुकलों' असं वाटून बिचारा रत्तू गप्प नसला !
 काल किती मंदपणानें चालला होता ! चोहीकडे उदासीनता आणि भयाणतेचच साम्राज्य पसरलें होतें ! माझ्या आईच्या दुःखद मृत्यूनें आजच्या दिवसाला देखील असह्य शीण झाला होता ! त्याचे पाय पांगु - ळले होते. तो जागचा हलतच नव्हता असे मला वाटलें ! किती किती वेळ झाला, तरी बाहेर गेलेला दादा अजून परत आला नव्हता! मी दारांतच दादाच्या येण्याकडे लक्ष लावून बसलें होतें ! अश्रु गालावरच वाळले होते ! डोळे तारवटले होते. केस अस्ताव्यस्त झाले होते. देहा- वरच्या वस्त्राची दुर्शशा तर विचारायलाच नको ! पळ घटके सारखा, आणि घटका युगासारखी चालली होती !
 जिन्यांत धडधड झालें, मी दुसरीकडे पहात होतें, तो जिन्याकडे पाहिलें. बबूताई हंसत हंसत वर आली ! वर येतांयेतांच—“क्षमाकर ताई, दोन दिवस यायला झालं नाहीं त्याबद्दल ! आज दारांतच बसली आहेस! दादा आहे का ? - आज त्याला बाबांच्या मुलाखतीला याय-" इतकें म्हणत ती जिन्याजवळून धांवतच माझ्याजवळ आली. माझ्याकडे तिचें लक्ष गेलें ! शेवटचं शब्द तिचेतोंडांतच राहिले! माझें उतरलेले तोंड आणि विद्रुपता पाहून बबूताईचें तोंड खर्रकन् उतरले. आवाज बदलला !- माझा हात हातांत घतला - एक पाय उंबऱ्याच्या आंत एक बाहेर मला विचारलें, “कायग, आहे ? मी रडूं येऊ नये म्हणून पदराचा बोळा तोंडाला घालीत - ताईच्या हाताला घट्ट धरीत म्हटलें-