पान:मजूर.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १२ वें.

66 'ताई, आज आई अशी ग का गप्प-चाप निजली आहे ? बोलेना कां ? रागवली आहे होय आपल्यावर ? माझ्याकडे पाहून आज हंसेना बघ ती ! कां ग ? मी तिच्या अंगावर लोळून त्रास देतो म्हणून का? बरें तर आतां नाहीं तिच्या आंगावर लोळत अं ! मग रागावेल का ? हंसेलना मग आई ? -अ ईच्या अंगावर पांघरूण ग कां घातलें नाहींस ? घाल की ! तिच्या अंगावर माशा बसताहेत बघ ! मी घालूं का ? " रत्नुच्या या बोलण्यापुढे मी काय बोलणार ? त्याच्या बोलण्यानें फिरून पोटांतून खळबळायला लागले ! मी कांहींच बोललें नाहीं ! आईच्या मुग्वाकडे पाहिलें ! आईनें- शांतपणाने हंसत जगाचा आमचा कायमचा निरोप घेतला होता ! तिच्या मुखावर मंगल हास्य विलसत होतें ! पावित्र्यमूर्तिमाता मृत्यु शय्येवर पहूडली होती तरी आपल्या शुभ हास्यमुखाने त्या जागेत पावित्र्याचा परिमल सोडीत होती ! मी देहभान विसरून एकाग्रतेने आईच्या मंगलमय महानिद्रेतही असलेल्या प्रशांत हास्यमुखाकडे पाहाण्यांत तल्लीन झाले होतें ! - " ताई ! ताई ! ” मला हलवून रत्नु म्हणाला, " तूं बोलत कां नाहींस ? आईला पांघरूण कां घलीत नाहींस ! मला कां घालूं देत नाहींस ! आई जागी झाल्यावर मी तिला सांगेन बघ कीं, तुला माशा चाचत होत्या तरी, ताई तुल। पांघरूण घालीना की मलाही घालू देईना ! तिला रागें भर ! ” रत्नूच्या या अजाण बोलांनी कुणाला रडूं आलें नसतें ? पण मी त्या वेळीं भान. वर कुठें होतें ? रत्नु बोलत होता, आणि मी त्याच्याकडे वेड्यासारखी पहात उभी राहिलें होतें ! मला या वेळीं कशाचीच जाणीव राहिली नव्हती. मी स्वप्नांत आहे की जागी आहे, बाहेर दिवस आहे की रात्र आहे ? आपण आहोत कुठे ? आपल्याला कुणी जगांत आहे की नाहीं ? आपण कुणाच्या आहोत ? जग तरी काय आहे ? आपण आपण तरी कोण- कुठें--कशा आहोत ? मला त्या वेळी वेडाच्या भ्रमाची किंवा भ्रमाच्या वेडाची लहर आली होती यांत शंका नाहीं ! “ ताई ! ताई !” रत्नुनें पुन्हां गदगदां हलविलें ! मी त्याच्याकडे