पान:मजूर.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजूर

दादा कपडे करून बाहेर जायला निघाला, आमचा पहिला आवेग

कमी झाला होता. " मी येतों पुढली व्यवस्था करून ! " एवढे सांगून दादा बाहेर पडला. कठोर परिस्थिति डोळ्यापुढे दत्त म्हणून उभी राहिली ! मुंबईची वस्ती. पैशाशिवाय बसतां येत नाहीं उठतां येत नाहीं ! पाषाणमय परि- स्थितीच्या जाणीवीनें क्षणभर आईच्या चिरवियोगाच्या दुःखाला खाल पहावयाला लावलें ! दादा बाहेर गेला आहे खरा ! पण पैशाचें काय- कसे करणार ? या विचागनें मस्तक बधीर झालें ! डोळ्यांतले अश्रु डोळ्यांतच थांबले. परिस्थितीच्या या जहरी कडवट घोटानें मला निमित्र मात्र मूछी आली !

रत्नुला कडेवरून खाली सोडला होता, आणि मी खिडकीच्या बाहेर

शून्य मन नें पहात होतें ! दादा बाहेर गेला. माझें रडूं थांबलें होतें. रत्नु पण रडायचा थांबला होता. आतां तर तो खुशाल आईजवळ बसून, हातालगतची खेळणीं घेऊन खेळायलाही लागला होता ! त्या अर्भ काला काय कल्पना होती ? मी दादा रडायला लागलों म्हणून तोही रडायला लागला होता इतकेंच ! मरण्याची त्याला काय कल्पना होती ! कांहीं नाहीं ! खेळतांखेळतां, तो आईच्या आंगावरही आपले आंग टाकीत होता. आईच्या आंगावर आंग टाकून, हंसायला लागे, आईच्या तोंडाकडे पाही; त्याला वाटे आईनेंही हंस वें ! आई आज हंसेना ! तो नेहमी असे करी ! बाहेरून येई. आईच्या आंगावर जाऊन लोळ ! आणि आई रागावली कीं काय ? हें अजमावण्याकरितां तिच्याकडे पाही. आपण हंस. आपण हंसतांच आई हंसली म्हणजे त्याला बरे वाटे ! मग त्याची खात्री होई कीं आई रागावली नाहीं. कारण एकादेवेळीं तो अंगावर लोळाया लागला म्हणजे तिला तें सोसत नसे. ती म्हणे, नको रे रत्नु मला असा त्रास देऊं ! मला सोसत नाहीं पहा ! " !

पण आई आज तसे कांहींच करीना ! हंसेना की रागवेना ! म्हणून

रत्नु आईजवळून उठला ! माझ्याजवळ आला. मी बाहेरच पहात होतें. माझ्या पदराला धरून ओढून मला आंत पहावयाला त्यानें लावलें. मी आंत पहातांच रत्नु अगदी नेहमींच्या आवाजांत - हंसत विचारतो :-