पान:मजूर.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १२ वें.

११७

मी रत्नुला आईजवळ केलें ! तिनें त्याच्या अंगावरून हात फिर-

विला त्याचा मुका घेतला. 'हा गुलामा ! जातें अं मी ! रडूं नको !- संतूदादा, अन् सुगंधाताई संभाळील तुला अं !- जातें बाळांनो- राम ! राम ! राम ! "

झालें ! संपलें ! आईची प्राणज्योत मालविलीं ! आम्हीं पोरकी झालों.

दिवसाढवळ्या आमच्या जागेत अंधार पडला ! बाप गेला, आई गेली ! वर आकाश, खालीं जमीन ! दादा-मी- रत्नू ! तिघांना एक- मेकांना आतां एकमेकाशिवाय, आपले म्हणायला, भलें बुरें म्हणायला, कोणत्याही केल्या कार्याचें कोडकौतुक करायला, उत्तेजन द्यायला - गोड बोलायला कीं, अधिकारानें रागवायलादेखील कोणी-कोणी राहिले नाहीं ! आईच्या प्रेमाचें छत्र दुष्ट कालानें आज आमच्या हातून हिरावून घेतलें ! आम्ही भावंडे असहाय, अनाथ, होऊन उघडी पडलों ! आईनें डोळे मिटले ! एकच आकांत झाला !

" आई! आई! गेलीस आम्हांला टाकून तूं!” एवढेंच म्हणून दादानें

एकदांच हंबरडा फोडला ! माझ्या आकांताला पारावार उरला नाहीं ! माझ्या दादाच्या रडण्यानें रत्तू मोठ्यानें रडायला लागला ! कुणी कुणाला समजावयाचें ? कुणी कुणाला रडूं नको म्हणून सांगाव- याचें ? पण दादानें स्वतःचें स्वतःलाच आवरलें ! आम्हांला रडूं नका म्हणून सांगण्याच्या भानगडींत पडला नाहीं ? मी रत्नुला कडेवर घेतलें ! मुक्तकंठानें आम्ही दोघे रडत होतों ! जवळपासचें तरी कोण येणार ? कोणी जवळपास नव्हतें, मुंबई ती ! केव्हांच शेजारपाजारची मंडळी उद्योगाला निघून गेली होती ! दत्तासाहेब तिथे नव्हतेंच ! कोणी आलें नाहीं. कुणी येण्यासारखे नव्हतेंही ! दादानें रत्नूला खाली ठेवायला सांगितले. मी आणि दादाने आईला घोंगडविर ठेविलें. आतां पुढची व्यवस्था !

शिलकेंत तांबडा पैसा शिल्लक नव्हता! महिन्याची अखेर आली होती.

चार दिवसापेक्षा जास्त पुरण्याइतकें मान्य देखील शिल्लक नव्हते. मग पैसा कुठून येणार ?