पान:मजूर.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजूर

जीची मर्जी अशी होती ! देव किनई जें करतों तें चांगलेच असतें बरं का ?

हरे ! राम ! राम ! बाळ, सुगंधाताई, राम-राम म्हणा बरं आतां !

वाईट वाटू देऊं नका ! रडूं नका ! माझें चांगलें होतें आहे ! सोनं होतं आहे ! इतक्या गरीचींत, इतक्या हालांत-पण इतक्या सुखांत, इतक्या समाधनांत, सदगुणी मुलाच्या मांडविर, त्याच्या हातचें पाणी मिळून-मरणसुद्धां फार थोड्यांच्या वांटचाला येत असतं ! भाग्याशिवाय हे कुणाला मिळत नाही ! हे भाग्य मला लाभलें आहे ! म्हणून सांगतें ! रडूं नका ! माझं चांगलं झाले आह, तुमचें मंगल होईल !" प्रत्येक शब्द आई सावकाश, पण स्पष्ट बोलत होती ! जीभ अडखळत नव्हती ! की तिला मृत्यूची भीति वाटत नव्हती ! " संतूचाळ, " आई आणखी बोलूं लागली, " स्वारीच्या मागें पांच वर्षीत, रोजच्या संसारांत तुला एका रीतीनें नुसती भारच होऊन बसलें होतें ! आजार-आजार सारखा माझा आजार तुझ्या पाठीशी लागला होता! माझ्या हातून तुझ्या चणचणीच्या काळांतच तुला कसलेच सुख मिळाले नाहीं, तुझ्या ऐन कठीण काळांतच माझ्या मृत्यूची आणखी भर पडते आहे ! पण काय करणार ? आलें देवाजीच्या मना ! देवाच्या आज्ञेला मान दिलाच पाहिजे ! पण किनई, माझ्या मृत्यूनें तुझा धीर खचूं देऊं नकोस ! ज्यांत पाऊल पुढे टाकले आहेस, तें मागें घेऊं नकोस ! देव तुला कधीं उणं पडूं द्यायचा नाहीं, देवावर पूर्ण निष्ठा-अढळ विश्वास दृढ विश्वास ठेव म्हणजे झालें ! कायेनें वाचेनें मनाने दुसऱ्याचें अकल्याण करूं नकोस, बोलूं नकोस, चिंतूं नकोस ! सद्बुद्धीनें चांगले करीत रहा, चागलेच होईल !--अहाहा! आतां थोडें पाणी राज !--हं पुरें. यापेक्षां मला जास्त कांहीं सांगावचें नाहीं. सुगंधेचा नी रत्तूचा भार तुझ्यावरच आहे ! एकमेकाला विसरूं नका ! अंतर देऊं नका !- जगाला आपले म्हणा ! म्हणजे जग तुम्हांला आपोआपच आपले म्हणेल ! मंगल करीत रहा, मंगलच होईल ! राम ! राम ! राम !- जातें हं आतां ! मंगल चिंता--राम म्हणा ! राम राम राम !--रत्नुलाजवळ आणा बरें ! त्याला अस्खे- रचं डोळे भरून पाहू द्या ! मुका घेऊं द्या ! "