पान:मजूर.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १२ वें. मी आईजवळ पुन्हां येऊन बसलें ! आतां आईची घालमेल जास्तच वाढली होती ! 66 बाळ, तुझी मांडी देतेस ना रे आतां ? " आई दादाला म्हणाली ! दादा चटकन् उठला. त्यानें आईचें मस्तक मांडीवर घेतलें ! अतां किनई, चमच्या-चमच्याने माझ्या तोंडांत दूध घाल अं थोडं ! पाणी घाल ! - तुझ्या मांडीवर डोके ठेऊन-हं असं - तुझ्या हातानें मला पाणी मिळाले म्हणजे – " मी दादाजवळ दुधाचा प्याला-चमचा दिला ! दादानें दोन चमचे आईच्या तोंडात दूध घातलें ! 66 'हं ! आतां बरें झालें ! बाळ, सुगंधाताई, माझ्या बद्दल कुणी रहूं नका बरें का ? रत्नुला रडूं देऊं नका ! त्याला भीति वाटेल, दत्तास: हे- बाच्या माणसांत त्याला नेऊन सोडा मग हं ! अशा वेळेला रडलें म्हणजे किनई, जात्या जिवाला कष्ट होतात ! देवाघरीं त्याला मग चैन पडत नाहीं ! " आई एकेक शब्द बोलत होती ! माझ्या डोळ्यांतल्या पाण्याचे बांधत्र फुटले होते ! दादा मात्र शंजीब्रह्माचा अवतार बनला होता ! त्याच्या डोळ्यांत पाण्याचा टिपूस नव्हता ! ब्रह्माडांतला त्यानें शांतपणा आपल्या ठिकाणों एकवठविला होत ! 55 बाळ, कालपासून तुमची ती बबूताई आली नाहीं, नाहीं ? तिला पण शेवटचें पहावेसे वाटत होते मला. ती आपल्या सुगंधासारखीच मला वाटायला लागली होती ! बरें ! एवढी मोठी थोरामोठ्याची पोर ! पण तुमच्यावर तिचा केवढा लोभ आहे. देव तिचें मंगल करो ! ” आई पुन्हां थांबली ! मला किंवा दादाला बोलावत नव्हतें ! " बाळ, स्वारीला जाऊन पांच वर्षे झाली. आज मी चालले ! माझे डोळे मिटायच्या आंत तुझं बस्तान थांग्याला लागून तुझे दोन हाताचे चार हात झालेले दिसले असते सुस्थळी पडून तिचे चांगलें चालल्याचें ऐकायला मिळालें असतें-रत्नुच्याला अवकाश होता - पण एवढे जरी दिसलें असतें-पाहाण्याची इच्छा होती-जाऊं दे ! देवा-