पान:मजूर.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ मजूर यावर बनाई बिचारी काय बोलणार ! मुकाट्यानें बसली. थोड्या वेळानें दादाच म्हणाला, " तें सगळं जाऊं दे ! आम्ही या प्रसंगांत पडलो आहोत, आम्ही तपश्चर्येला सुरुवात केली आहे, ती आमची आम्हीं पाहून घेऊं. पण मला सांग, तूं आमच्यावर इतकें निर्हेतुक, एकनिष्ठ, प्रेम कां करावेंस ? " कुणास ठाऊक ! मला कांहींच सांगतां येत नाहीं ! " बहूताईनें एकदम उत्तर दिलं. 66 आई म्हणतें तेंच खरें ! तूं देवकन्याच असली पाहिजेस ! " दादा उद्गारला ! दादाचें जेवण झालें, मग मी बसलें बब्रूनाईला बसविल आमची मीठ भाकर बबूताईनें एकाद्या पक्कान्नासारखी मिटक्या मारीत मटकावली. 66 66 दादा " मध्येच ताईनें विचारलें, " बाबांना भेटायला येशील १ " मजुरा-यामार्फत - मजुरांचा मुख्य म्हणून मजुरांचा मजूर म्हणून शेटजींच्या पुढे यायला माझी केव्हांही तयारी आहे ! " 66 मग मी भाईकडून तशी तजवीज करवीन ! म्हणजे बाबांचा स्वभाव तरी तुला कळेल ! तुझ्याशीं वोलणें झाल्यावर चुकून वाईटपणाचा अंश राहिला असेल तर धुवून जाईल ! दादानें तें कबूल केलें. ताई जायला निघाली. दादाला पण मजूर संघाकडे जायच्या वेळेपर्यंत मिळेल तेवढी विश्रांति घेणें अवश्य होतें, म्हणून तो तसाच पडला. बबूनाई मोटारीत जायला बाहेर पडली ! तेव्हां दारांतून चटकन् कुणी बाजूला झालें. ताईची मोटार गेली. ती जाईपर्यंत मी गॅलरींत उभी होतें. आंत यायच्या वेळी सहज लक्ष गेलें, तो आमच्या जिन्यांतून मॅनेजर खुशालचं- दाचा एकदां गिरणीच्या ऑफिसमध्ये मी पाहिलेला बॉय उतरून तडक चालला होता ! बबूताईच्या मोटारीच्या टायरमधून आला तो, तो बॉय होता !