पान:मजूर.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ११ वें " कोणास ठाऊक ! भांडवलवाले किंवा मजूर दोहोंपैकी कोणी तरी एक हटतील तेव्हां ! -कां ? " 66 " नहीं म्हटलें, सप संरेपर्यंत आई, सुगंधाताई, रत्नु, यांना माझ्याकडे घेऊन जाऊं का ? म्हणून विचारण र होतें-विचारणार आहे- विचारतें आहे ह्मण पाहिजे तर !" बबूताईनें आपला हेतु प्रदर्शीत केला ! शाब स ताईं ! आणखी ? माझ्या मंडळींना एक नेशील. आमची चार दिवसाची चंदी संपल्यावर आणि संघ नाहीं लवकर संपला तर आमचें काय होईल म्हणून तुला काळजी पडली आहे ! वा ! खूप आहेस ! पण मुंबईतल्या लाखो मजुरांनीं- आणि त्यांच्या कुटुंबियांनीं संन संपेपर्यंत काय करावें ? त्यांच्याकरितां काय करशील ? वेडी तर नाहीस बबूताई ! - बबूताई, तूं अमच्यावरील निर्हेतुक प्रेमाची आणखी किती आणि कशी परमावधी करणार ? " ताईच्या बोलण्यानें दादरा सद्- गदीत झाला ! 66 " द'दा, बब्रूताई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, 'खरेंच, मग तुमचें कसें होईल ? ” " जे आज लाखो संप करून स्वस्थ बसलेल्या मजुरांचं होईल, तेंच माझें होईल ! जनता जनार्दनावर माझा विश्वास आहे ! मजुरांचा मा देव आम्हांला उपाली कां अणि किती दिवस ठेलि ? शिवाय, बबूताई, एरव्हीची गोष्ट निराळी, अ.तांची निराळी ! तुझ्या घरी तरी माझ्या मंडळींनीं कां आणि किती दिवस यायचें ? अशा येण्यानें-तुझे आमच्या वरचें प्रेम अजरामर होईल खरें, पण त्यानें चालू कार्याचा शेवट होईल काय ? आतां तर काय ? सामान्यव्यवहारदृश्या तुम्ही आम्हीं शत्रू आहोत. या दृष्टीने विचार कर ! ताई, मी आतां कसा झालों तरी, मजु- रांचा पुढारी झालों आहें ! ज्या हजारो मजुरांच्या मालीकेत म्हणून बसलों आहे आणि जी त्यांची तीच माझी स्थिति, असा माझ्याबद्दल ज्या मजुरांचा विश्वास आहे, त्यांना त्याच अवस्थेत टाकून, मी माझ्या मंडळींना पाठवून तुझ्याकडे देऊं ? आणि आरामांत चैन चमन करायला लावूं ? - मग तूं तरी काय म्हणशील ? तुला बरें वाटेल काय तें ? 66