पान:मजूर.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १२ वें. आईचा मृत्यू ! " आई ! आई ! असें ग काय करतेस ? - आई ! - डोळे उघडून बघ बरें ! " " काय म्हणतेस सुगंधा ! असें तोंड वाईट कां केलें आहेस ! - बाळ कुठे आहे ? " " आई, मी तुझ्याजवळच आहे बरें का ?" " आणि रत्नु ? - रत्नुला मला भेटव बरं ! सुगंधाताई, असे काय बरें वाईट तोंड करावें ? -चाळ, तूं देखील असा हिरमुसला होऊन बसला आहेस का ? वेडा का आहेस तूं ? - तूं असा बसल्यावर सुगंधाताईंची समजूत कुणी बरें करायची ? तुमच्या तोंडाकडे पाहून माझ्या रत्नुराजानें कसें चिमणीसारखें तोंड केले आहे पहा बरें ? " आईची अखेर वेळ होती ! आम्ही सगळीं तिच्या भोंवतीं बसलों होतों. आज दोन रात्रीं दिव्यानें उजाडल्या होत्या ! आईची अखेर वेळ आहे, हे आम्हांला कालच कळून चुकलें होतें. पण दगडासारखी मनं घट्ट करून आंतल्य आंत येणारे उमाळे गिळून टाकीत होतों ! सकाळी दहा वाजून गेले होते. तरी कोपन्यांतल्या कंदीलाला निरोप द्यायचें कुणालाच भान नव्हतें ! दिवसाच्या प्रकाशानें विचारा निष्प्रभ झाला होता ! पहाटेंपासून आईची आशा सुटली होती. आजचा दिवस- दिवस कसचा? दुपार देखील उलटायची मारमार आहे, असें पक्केपण कळून चुकलें होतें. दादा माझ्याकडे पहात नव्हता. मी दादाकडे पहा- ण्याचें धाडस करीत नव्हतें ! आमच्या जागेत घोर शांतता विहार करीत होती ! आम्हां सगळ्यांचें आईच्या मुखाकडे लक्ष खिळून राहिलें होतें. अखेरच्या वेळी आईनें आमच्याशी कांहीतरी सारखें बोलत रहावें, असें वाटत होतें; तर आईनें म... ८