पान:मजूर.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० मजूर मजुरांच्या म्हणण्याचा मंजुरी देतील असा माझा अंदाज आहे ! ” दादानें आपला कयास सांगितला. 66 66 " तसेच करणार आहेत ! " बबूताईनें माहिती दिली. "आणि भाई हेच बोलत होते ! मी ऐकलें हैं. आणि म्हणूनच तुझ्या विषयीं त्यांच्या वानावर कांहीं जरी कुणी वाईटसाईट घतले असले, तरी आजचें तुझें संपाच्या वेळचें सभ्यतचें, शहाणपणाचें, शिस्तीचें, मोकळेपणाचें वर्तन पाहून त्यांच तुझ्याविषयाच दूषित पूर्वग्रह बदललेच असले पाहिजेत ! ” ईश्वर करो आणि तसे असो ! " दाद ने चालू विषयाचा समारोप केला. दादा व बबूताई या प्रमाणे बोलत असतां, मी दादाकरितां खायचे तयार केलें. अई बसून कंटाळली होती, ती कलंडली ! रत्नु, दादा व बबूताईचा संवाद दोघांच्यामध्ये बसून एकाग्र चित्तानें ऐकत होता. गुला माला जसें कांहीं सगळे त्यांचे बोलणें कळतच होतें ! दादाला जेवायला उठाया सांगितले. दादा उठला. कपडे काढले. दादानें खुंटीवर कपडे ठेवायच्या वेळेला-खिडकीच्या दाराजवळ-ब हेरच्या बाजूला कांहीं तरी खडखडल्याचा आवाज झाला ! कांहीं तरी लुकलुकल्याचा भास झाला ! आमचें कोणाचेंच फारसें लक्ष गेलें नाहीं. 'काय खडखडलें ? ' म्हणून आईने विचारलें. तिचें लक्ष गेलें होतें. कायसेसे लुकलुकल्यासारखे झालें रे ! " दाद नें इकडे तिकडे पाहिले; त्याला काहीच दिसलें नाहीं ! " असेल उंदीर ! मुंबईला उंदीर कांहीं कमी नाहींत. माणसाला भीत नाहीत; कांहीं नाहीं ! " दादा म्हणाला. पाटावर यऊन दादा बसचा. बबूताईनें दादाला वाढावयाला घेतलें. मी घेणार म्हणाली वाढायला ! दादाला वाढण्यांत तिला धन्यता वाटत होती ! 66 जेवण चालू असतांच बबूताईनें दादाला विचारलें, दादा, तुला एक विचारूं का ? तुला राग नाहीं ना येणार ? " " अरे वा ! माझ्या रागाची बरीच भीति वाटते आहे की तुला ? बरें, विचार तर खरें. रागालोभाचें पुढें पाहूं ! -" दादा उत्तरला. 66 हा संपाचा वणवा चालणार किती दिवस १ " बबूताईने विचारलें.