पान:मजूर.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ११ वें. १०९ " हे झाले ! " दादाला मनापासून बढ़ताईच्या उत्तराने आनंद झाला ! पण तो आणखी मुद्दाम म्हणाला, " निघतांना असा अनुभव येईल अशी कशी कल्पना केली होतीस ? १ " केवळ तुझ्यामुळे ! दादाच्या हातून असे व्हायचें नाहीं ! कदाचित् तितक्यांतून ठरले असेल तरी बाबांच्या आणि भाईच्या बरोबर मला पाहून तरी संतदादाला निश्चय बदलावा लागेल. लावीन ! आणि आला ह च अनुभव या विश्वासानें आलें होतें ! " बबूताईनें सरळ उत्तर दिले ! या प्रेममय उत्तराने आम्हां सर्वोचच- प्रेमाचे हृदयसागर उचंबळून आले ! बच्चळ ! तूं प्रत्यक्ष देवता आहेस ! ईश्वर तुझें अखंड कल्याण करील ! " दादावर्गल बबूताईचें अकारण, अढळ, निर्मल, निश्चयाचें आईनें प्रेमपाहून सद्गदीत अंतःकरण ने आशिर्वाद दिला ! 66 66 बबूताई आम्ही इतकी डेंजरस माणसे आहोत, अशी शेटजींची, भाईची समजूत आहे काय ? " दादानें चौकसपूर्ण अर्थाने विचारलें ! " मुळींच नाहीं ! " बबूताई उत्तरली ! " तुझें मत किंवा तुझें वाटणें सांगू नकोस ! " दादा म्हणाला, " शेटजींच-भाईचें मत माझ्याबद्दल काय आहे ?" " बाचांच्याबद्दल मला आजच सांगतां येणार नाहीं. पण वाईट मात्र नाहीं, इतकें मी सांगूं शकेन ! भाईचें मत सकाळपर्यंत जवळजवळ माझ्याच प्रमाणें होतें - आतां सर्वस्वी माझ्याचप्रमाणे झाले असेल !" ताईने सांगितलें. " तें कसें आणि कां ? " दादानें फिरून विचारलें. “ भाईच्या कानावर तुझ्याबद्दलच्या ज्या कंडया गेल्या होत्या, त्यांनी थोडें तरी त्याचें मन गढूळ झाले असेल, ते प्रत्यक्ष अनुभवानें निवळले ना ? " ताईनेंच दादाला प्रश्न केला. व पुढे म्हटलें, "बरें, संतूदादा, बाबा काय करतील - मजुरांच्या बाबतीत कसे वागतील असा तुझा समज आहे ? " "शेटजींच्या एकट्याच्या हाती काय आहे ? मिलओनर्सअसोसिए- शन काय ठरवल, त्यावर अवलंबून राहणार ! " दादा म्हणाला. " तें खरें, पण बाबा काय करतील ! असोसिएशनमध्यें बाबा काय पक्ष घेतीलसें तुला वाटतें ? - " बबूताईनें पुन्हां विचारलें.