पान:मजूर.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ मजूर " मी होय !" बबूताईनें तितक्याच शांतपणें उत्तर दिलें ! " नेहम- प्रमाणे, माझ्या सुगंधाताईकडे आणि संतुरामभाऊकडे-भेटायला आलें आहे ! " " पण मी आज तुझ्या बाबांचा उघड उघड शत्रू म्हणून झालो आहे " दादा म्हणाला. 66 मला नाहीं तसे वाटत !” बब्रूताईनें आपले मत दिलें ! “ कां बरें ? आज तूं प्रत्यक्ष पाहिलेंस ना ? शेटजींच्या देखत-मजु- रांचा पुढारीपणा स्वीकारून आपल्या गिरणीचा संप घडवून मी आणला आहे ! -शेटजींच्या दररोजच्या हजारो रुपयांच्या नुकसानीला मी कारण झालो आहे !" दादा आणखी पुढे गेला ! " होय ! मी तें प्रत्यक्षच पाहिले आहे. तरीपण माझं पहिले मत अजू- नही कायमच आहे ! आणि म्हणूनच मी इथें आलें आहे !" " पण शेटजींच्या तुझ्या वडिलांच्या आणि भाईच्या कानावर मी तुमचा शत्रू झाला आहे- खाल्ल्या अन्नावर उलटलों आहें-असं रिपोर्ट गेले आहेत - " दादाचें चालूच होतें ! - " होय, आणखी सुद्धां पुष्कळ ऐकलें होतें !" बबूताईनें सांगितलें. काय ?" दादानें हंसून चौकशी केली ! 66 " कीं संतुराम, माझे बाचा जर संगच्या वेळीं गिरणीवर आले, तर मुंबईच्या मवाल्यांकडून मोटारविर दगड फेंकावयाला लावून मारणार अहं ! " हैं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले ! माझे आंग थरर्र झालें ! “ श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम !" आईच्या मुखांन धीर गंभीर उद्गार निघाले ! " असं ?" दादा हंसून म्हणाला, " इतकी माहिती मिळाली असून शेटजी, भाई, आणि त्या बरोबर तूं पण कशी आलीस ? -तुला भीति नाहीं का वाटली ? तुझ्या आंगावर, शेटजींच्या बरोबर आ.ण भाईच्या चरोबर दगड पडले असत म्हणजे १" " पण पडले नाहीत, चटकन् उत्तरली ! हें आतां सिद्धच झालें आहे ना : " बबूताई