पान:मजूर.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वें.

१०७

नॅच बबूताईचा पुढे होऊन हात धरला ! " चल ताई वर ! आमच्या- कडेच आली आहेस ना ? " दादाचा स्वर अत्यंत स्वच्छ, सरळ, प्रेमळ, असाच बबूताईच्या कांनों पडला !
 "होय दादा !" एवढेच ताईनें उत्तर दिलें ! पण या वेळीं ताईचा कंठ किती रुद्ध झाला होता, हे तिचें तिलाच माहीत ! दादाला तिच्या मनःस्थितीची कल्पना आली होती, पण त्यानें मुळींच त्याबद्दल जाणीव दिली नाहीं ! बुताई मुकाट्याने दादाच्या हातांत हात देऊन वर आली !. दोघे वर आल्यावर थोड्याच वेळाने रस्त्यावर घुटमळणारा मुलगाही जिना चढून वर आला पण तडक वर न येतां मध्येच दत्तासाहेबांच्या ऑफ- सच्या दारांत पुन्हां घुटमळला !
 दादा ट्रॅममधून आणि बबूताई मोटारीतून उतरल्याचें मी वर गॅलरीतून पाहिले. त्या वेळी मी गॅलरींतच होतें ! दोघे वर आली. मी दार उघडलें ? आई शुचिर्भूतपणानें - स्वच्छ पांढरी धाबळी अंथरून 'गुरुचरित्र' वाचीत बसली होती ! यावेळी तिच्यापुढे "पदरीं मूठ दीडमूठ धान्य अस- लेल्या आणि गुरूची सेवा करणाऱ्या बुद्धीहीन भक्ताचा अध्याय होता !. तो अध्याय आई वाचीत होती.
 दादा-बबूताई दोघे आंत आली. दादानें कपडे काढले, "आणि फाटक्या सतरंजविर अंग टाकले. बबूताईने माझा हातांत हात घेतला !. आम्ही दोघी आईच्या पोथीपुढे बसलों ! आईचा अध्याय वाचून संपला!. तिनें वर दादाकडे आणि बबूताईकडे पाहिलें ! आणि दीर्घ निश्वास सोडला !
 "काय ?" आईनें दादाला क्षीण-खोल आवाजांत विचारलें !
 आज आमच्या गिरणीचा संप झाला ! " दादानें मोजक्या शब्दांत उत्तर दिलें !
 पुन्हां कांहीं वेळपर्यंत अत्यंत गंभीर अशी शांतता पसरली !
 बबूताई, " दादानें त्या शांततेचा भंग केला. " बबूताई, आज तूं इथें कशी ? कुणाकडे, कां म्हणून आली आहेस ? "