पान:मजूर.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
मजूर


 बबूताई परत बंगल्यावर निघाली होती. पण तिच्याने राहावेना. तिनें आपली मोटार आमच्या बिन्हाडाकडे वळविलीच ! दादा ट्रॅममधून ' घोषी तलाव स्टँडवर उतरण्याला आणि बबूताईची मोटार तिथे येऊन थांबा- यला एकच गांठ पडली !
 काकदृष्टी मॅनेजरचें लक्ष तशाही गडबडीत दादा, आणि बबूताई यांच्याकडं होतेंच. ‘दोत्रे परस्पराकडे पाहाताहेत की काय ? पाहून त्यांच्या विकारविकारांचंच प्रतिबिंब कांहीं पहावयाला मिळतं कीं काय ?' अशा तऱ्हेचा शोधकपणा चालविल्याचे त्या वेळीं जर कोणी मॅनेजरकडे पाहिलें असतें, तर त्याच्या लक्षांत आल्यावांचून राहिलें नसतें ! त्याचें, दादा आणि बबूताई तेथून आपापल्या मार्गाने दूरवर जाईपर्यंत लक्ष होतें. बबू- ताईनें आपल्या बंगल्याचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला मोटार वळवी- पर्यंत मॅनेजरच्या नजरेचा पल्ला पोचला होता, अशा शंकेस जागा होती. कारण तसे नसतें, तर बबुताईची मोटार थांबली त्यावेळी मॅनेजरच्या ऑफिसमधून एक पाय मोठ्या सावधगिरीने निघून कोणाला संशय येणार नाहीं अशा रीतीने येऊन मोटारच्या मागें उगाच उभा राहिला नसता ! आणि मोटारची दिशा बदलतांच, तो पोऱ्या मोटारच्या पाठी- मागें ठेवलेल्या टायरमध्यें चटकन् उडी मारून बसला नसता ! मोटार चालली होती ! टायरला लटलेल्या पोऱ्याकडे पाहून रस्त्याने जाणारे रिका- मटेकडे लोक त्यांत मोकाट सुटलेले मजूरही असतील - हंसत आणि टाळ्या पिटीत ! त्या हंसण्याचा आणि टाळ्या आपल्याकडे अशा रीतीने लावून घेई कीं मुलगी म्हणून - आणि आम्हीं गिरण्या कशा कशीं गिरणीवाल्यांची नाके ठेचली ! कसें चिमणीसारखे हिरमुसलें तोंड करून पळायला लावलें आहे ! — अशा अर्थानें आपला उपहास, उपमर्द करण्या करितांच रस्त्याचे लोक हंसत असावेत, आणि टाळ्या पिटीत असावेत. य. मुळें धोबीतलावावर मोटारीतून उतरतांना बबुताई जास्तच खिन्न झाली होती. मांदार थांबतांच मागील पोऱ्या टणकन् उडीमारून दूर गेला. आणि उगीच या-त्या दुकानाकडे पाहण्याचा बहाणा करीत घुटमळू लागला !
 दादा-बबूताई दारांतच भेटली ! दोघांनी दोघांकडे पाहिले ! दादा-