पान:मजूर.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वे.

१०५


पहिल्या इतकाच प्रेमळपणा तिचा असे ! ' संपाच्या बातम्या ' आम्हीं दांधीही एकत्र वाचित असूं. आईला वाचून दाखवीत असूं, पण गंमत ही कीं ' दादाविषयीं चर्चा करावयाची दोघीही सावधगिरीने आणि हेतूपूर्वक टाळीत असूं ! ' दादा करीत आहे हें त्यानें करूं नये-निदान नाहीं केलें तर नाहींका चालणार ?' असा भाव एकादेवेळी तिला न जुमा- नतां तिच्या चेहेऱ्यावर उमटे ! पण ' दादाचें आहें तें अगदी बरोबर करणें आहे ! असें जाणविण्याची एकादें वेळा मलाही उबळ येई ! पग मी ती अट्टहासपूर्वक दाबीत असे !
 असा आमचा वर्तनक्रम चालला होता !
 झालें ! आज दादाच्या गिरणीचा संप जाहिर होऊन अमलांतही आला ! गिरणी बंद झाली ! पोलिस अधिकारी निघून गेले ! शेटजी इच्छारामभाई, आणि प्रेमचंदभाई मिलओनर्स असोसिएशनच्या ऑफ- सकडे चालते झाले ! गिरणीच्या व्यवस्थेसाठीं खुशालचंदाला तिथेंच थांबावे लागले होते. मजुरांचा समुदाय असाच दुसऱ्या गिरणीचा संप घडवून आणण्यास चालला होता !
 मिलओनर्स असोसिएशनमध्ये पुढे स्टेप कशी घ्यावयाची याची वाटा- घाट चालू होती ! आणि संपाच्या साथीमुळे आतां ती वाटाघट विशेष नेटानें करणें प्राप्तच होऊन बललें होतें ! मजुरांच्या मागण्या व म्हणणें त्यांनी विस्तृत - मुद्देसूद - साग्र लेखी मागितले असून, मजुरांनीही विचार- पूर्वकखलिता तयार करून तो नुकताच " असोसिएशन" कडे रवाना केला होता !
 दादा आज अत्यंत थकला होता. आज आठ दिवस अहोरात्र आलो- चन त्याला जाग्रण पडलें होतें. आठवड्यांत तीन चार वेळां तरी त्याच्या पोटांत कांहीं पडलें होतें कीं नाहीं, याची शंका होती ! संप झाला आणि आपल्या मजूर बांधवांना आपापल्या ठिकाणी पठवून " संध्याकाळी संप संपेपर्यंत कठिण काळ कोणत्या प्रकाराने कोणत्या धोरणानें कंठावयाचा याचा एकत्र बनून विचार करण्याकरितां यतों, म्हणून सांगून दादा चिन्हा- डाकडे यायला निघाला.