पान:मजूर.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
मजूर


इच्छारामभाईची भव्य मूर्ति अत्यंत शांत, विचारमग्न, आणि पुष्कळशी उदास दिसत होती. भाईप्रेमचंद अत्यंत काळजीपूर्वक संपाचा ठाव काढण्यांत सूक्ष्म रीतीनें निरीक्षण करण्यांत चूर झाला होता ! बबूताईची स्थिति तर विचारावयालाच नको! ती आळीपाळीने इच्छारामभाई, प्रेमचंदभाई, मॅनेजर, पोलीस अधिकारी आणि संतूरामदादा यांच्या• कडे पहात राहिली होती. तिची अगदीं कींव येण्यासारखी स्थिती होऊन गेली होती ! दादा सरांत कां शिरला ? तो इतका गंभीर-शांत कसा ? त्याचा हंसरेपणा - मनमोकळेपणा कुठे गेला ? आमच्या बाबांचे नुकसान होण्याकरितां दाद नेच तयारी करावी हें कसें ? - दादाचा आपला इतका स्नेह दादाच्या ध्यानातच आला नाहीं काय ? " एक का दोन १ अनंत विचार त्या वेळीं बबूताईच्या मनांत उद्भवले असतील ! तिची केवील- वाणी अवस्था झाली होती. तशाही स्थितींत दादाविषयीं बबूताईच्या अंतःकरणांत तिरस्कार, द्वेष, राग उत्पन्न होत नव्हता! ती सदयतेनें, प्रेमानें, अनुकंपेनें दाद कडे पहात होती ! " दादाने असें कां करावें ? " हा विकट प्रश्न मात्र तिला सुटत नव्हता! पण विचारणार कुणाला ? भाईला विचारण्याची सुद्धां त्या वेळीं तिची ताकद नव्हती ! ती अगदीं हतबुद्ध होऊन गेली होती !
 गेल्या पंधरा दिवसांत, संपाची वावटळ उठल्यापासून आणि दादा संपाच्या भरीस पडला आहे, हें कळल्यापासून बबूताई आमच्याकडे दर- रोज निदान चार दोन वेळां तरी येत असे, पण गंमत अशी कीं त्या पंधरा दिवसांत दादाची आणि तिची एकदांही गांठ पडली नाहीं ! दादाला ती विचारणार होती, पण गांठच नाहीं, तर काय करणार ? अणि पडणार तरी केव्हां आणि कशी ? बरें, बबूताई मला किंवा आईला काय विचारणार ? आणि आम्हांला सांगतां तरी कसें येणार ?
 दादा संत शिरला आहे, त्याने संपाचा पुढाकार घेतला आहे, हें जाहिर झाल्यापासून चबुत ई आमच्याकडे आली म्हणजे मला अगदीं चोर ट्यासारखे हं ई ! तिच्याशी मन मोकळेपणाने बोलायचे कसें १ बोललें तरी बुताईला तें पटेल का अशी शंका येई ! तिचा चेहरा उदास-केवि लवाणा असा दिसे. तरीपण आईशी किंवा माझ्याशी बोलण्यावागण्यांत