पान:मजूर.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वें

१०३


कपडघाशिवाय, आणि अन्नाशिवाय ठेऊन आतां किती दिवस धन्याची चाकरी करावयाची १ धन्याचें याकडे लक्ष जात नाहीं. तें लक्ष आपल्या- कडे लागावें, आपलीं गान्हाणी ऐकावीत- आपलें म्हणणें त्यांनी कबूल करावें, म्हणून आपल्याला कांहीं दिवस कामावरूनच दूर राहिलें पाहिजे. तर आपल्या धन्याचे आपल्याकडे लक्ष जाईल, व आपल्याबद्दल तें विचार करतील, त्याला संपाशिवाय दुसरा उपाय नाहीं. म्हणून आम्हीं काम सांडून गिरणीतून बाहेर पडलों आहत. आमची आणि तुमची स्थिति एकच आहे ! तुम्हीही आम्हांला मिळावें; आपण जर सर्व एक जुनीनें काम सांडून घरी राहिलों, तर आपले जास्त हाल होतील खरे, पण त्या शिवाय उपायच नाहीं. गिरण्या बंदच राहिल्या, आपल्या धन्याचें प्रत्यक्ष नुकसानच होऊं लागलें म्हणजे, ते आपल्याकडे खात्रीने लक्ष देतील अशी आशा आहे ! तर कृपा करा. आणि आपण आपली दाद लावून घ्या. तुह्मीं जोंपर्यंत आम्हांला मिळाला नाहीं तोंपर्यंत आपल्या धन्याचें डोळे उघडावयाचा तितकाच उशीर लागेल !" या प्रमाणें सांगावय चें, त्यांनी ऐकावयाचें, आपापल्या कामाच्या जागी जाउन उभे राहावयाचें, त्यांचा जो कोणी मुख्य असेल, त्यानें मात्र मॅनेजरकडे जाऊन आपल्या सर्व मजुरांचे म्हणणें सांगावयाचें व त्यांनी 'तें कबूल नाहीं ' म्हणून सां- गितलें कीं, काम करण्याला सुरवात करण्याऐवजी गिरणीच्या बाहेर पडावयाचें, मालाची नासधूस करावयाची नाही. यंत्रांना हात लावायचा नाहीं. गर्दी करावयाची नाहीं, कीं आरडाओरडा करावयाचा नाहीं !
 याच क्रमाने अगदीं शिस्तवार सब दादाच्या खटपटीनें, उद्योगानें, चिकाटीनें घडून आला ! दादाच मजुरांच्या तर्फे मॅनेजर पुढें (खुशाल- चंदा दें) मजुरांचा विनंती अर्ज मांडावयाला आला होता. या संपाच्या वेळी पोलीस बंदोबस्त जय्यत होता. पोलिस अधिकारी मॅनेजर, तर होतेच, पण खुद्द शेटजी इच्छारामभाई त्या ठिकाणीं आज हजर होते. इतकेंच नव्हे तर प्रेमचंदभाई, आणि आमची प्रेमळ मैत्रिण बबूताईसुद्धां तिथें आपल्या माटारींतून संपाचे दृश्य पाह्यला आली होती ! संपाचे काम शांत रीतीने धिमेपणानें होत होतें ! पोलिस बंदोबस्ताचा शोभपेक्षां अधिक उपयोग झाला नाहीं ! मॅनेजराच्या अंगाला अंगार लागला होता !