पान:मजूर.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
मजूर


मजुगला कसूर करूं द्यावयाची नाहीं. आपल्या गिरणीचा संप होण्याची घटका येईपर्यंत कोणीही कामगारानें, कामांत ढिलाई, दुर्लक्ष, बेपर्वा, किंवा चुकारपणा करावयाचा नाहीं, अशाबद्दल दादानें अविश्रांत श्रमानें शिस्त राखली होती. त्याकरितां आपल्या गिरणीतील जवळ जवळ प्रत्येक मजुरांकडे जाऊन त्यानें तयारी केली होती ! त्यामुळे खुशालचंदास रखा मॅनेजर दादाविरुद्ध कितीही तडफडला-धडपडला तरी त्यांचें कांहीं चालत नव्हतें ! त्याच्या गुरगुरण्याकडे, अपशब्दाकडे, किंवा एकाद्या फटक्या- कडेही केवळ दादाचें सांगणें ध्यानांत ठेवून, आणि त्याच्याकडे पाहून, कोणीही मजूर ढुंकून पहात नव्हता किंवा शिस्त मोडत नव्हता !
 मुंबईतल्या संपाला सुरवात होऊन पंधरा दिवस होऊन गेले होते ! दाशच्या 'इच्छाराम भाई — मिल' चा संप आज व्हायचा होता ! दादा घरांतून पहाटे पांच वाजतांच स्नान वगैरे आटोपून बाहेर पडला होता ! मॅनेजर खुशालचंदाची तर तिकडे त्रेधा तिरपीट उडाली होती. आपल्या गिरणींत दंगाधोपा होतो कीं काय ? हाणमार होती कीं काय ? आपल्यावर कोणी गदा आणणार नाहीं ना ? संतूराम काय करील ? कां आपणच त्याचा नक्षा उतरावा ? अशाही कदाचित् तो विचारांत असेल. त्याच्या हालचालीची दादानें बित्तंबातमी ठेविली होतीच ! त्याच्याश आपण कसं वागावयाचें, आपल्या गिरणींतल्या मजुरांना कसे वागवाव- याचें याबद्दल त्यानें योग्य प्रकारें ठरविलें होतें.
 खुशालचंदानें सरकारची मदत मागवून ठेविली होती. पोलिस बंदो- बस्त कडेकोट होता ! गिरण्या संपांत शिरत असता, त्या अशा तन्हेनं कीं, संप केलेले मजूर आपल्या मुख्य पुढाऱ्याबरोबर, ज्या गिरणीचा संप करावयाचा त्या गिरणीच्या मुख्य दरवाजापुढे उभे राहत ! त्या गिरणीचे कामगार लोक यांत जाऊं लागले, म्हणजे त्यांना त्या संपवाल्याचा मुख्य संपवाल्याच्यातर्फे म्हणून हात जोडून नम्र विनंती करी, "बंधु, आपले मालक, दिवसगत पाहून आपला रोजमुग वाढवीत नाहींत, आपल्या 'बोनस'चा हक्क कबूल करीत नाहींत, आपल्याला जनावरा- पेक्षांही हलक्या प्रतीचे समजून कामाचे तास कमी करण्याचा विचारही करीत नाहींत. अशा स्थितीत आपण आपल्या पोटाला चिमटा घेऊन बायकामुलांना