पान:मजूर.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वें

१०१


पर्वा नाहीं. संपाच्या चुकीचें माप कुणी मजुरांच्या पदरीं बांधित तर कुणी या धामधुमीचें खापर भांडवलवाल्यांच्या माथ फोडीत !
 संप संपण्याला जो तो आपापल्या बुद्धिशक्यनुसार उपाय सुचवीत असे! अशी संपांची तुफान लाट मुंबईच्या परिस्थितीच्या दर्यावर उसळून राहिली होती ! ज्या मजुरांच्या जवळ उपाशी पोट मारून वेळेला उपयोगी पडावा म्हणून ठेवलेला पै-पैसा शिल्लक होता. ज्यांना संप संपेपर्यंत मुंबईस राहणें अशक्य होतें; संग संपण्याची अनिश्चितता ज्यांना कळण्यासारखी होती, ज्यांना देशावर, आपल्या छोट्याशा शेतवाडीच्या ठिकाणी जाऊन राहण्याची साथ होती, ते भराभर मिळेल त्या गाडीनें मुंबई सोडून पसार होत होते ! या परत जाणाऱ्या मजुरांची स्टेशनवर गर्दी पाहून मनुष्य थक्क होत असे !
 गिरण्याप्रमाणेच रेल्वे, ट्रॅम, पोस्टमन, यांच्याही संपांची लाट मिस- ळत होती ! जिकडेतिकडे, रात्रदिवसा प्रत्येकाच्या तोंडी संपाशिवाय दुसरी भाषा नव्हती ! कांहीं वर्तमानपत्रे भांडवलवाल्यांच्या बाजूनें, तर कांहीं पत्त्रें मजुरांच्या बाजूने अगदीं अभिनिवेशपूर्ण हित!
 याप्रमाणे सर्व मुंबई संपमय झाली होती ! कोणी संघांत मिसळत, कोणी मिसळत नसत ! भांडवलवले आणि त्यांचे हस्तक मजुरामजुगंत फंदफितुरी करून पक्षपात करून, संपांतून निसटवून कित्येकांना भुलावणीनें आणीन !' संप मोडला ! मजूर शरण आले !' असा आपणच उगाच ओरडा करीत !
 संपाच्या सत्राला सुरवात झाल्यापासून दादाच्या पायाला चक्र बांधलें होतें. त्याला दोन दोन दिवस खाण्यापिण्याची शुद्धि न ती ! चार चार रात्री झोंप त्याच्या डोळ्याला माहीत नव्हती, कीं विश्रांति म्हणजे काय हैं त्याला कळत नव्हतें ! दादा मध्येमध्ये तर बिन्हाडीं चार चार दिवस आला नाहीं ! मजुरांच्या मोहल्यांत जाऊन, त्यांना नीट सांगून संवरून, धीर देऊन, शांत राह्यला सांगून, अत्याचारापासून अलिप्त राहण्याची सद्बुद्धि शिकवून, फंदफितुरी न होण्याबद्दल, बंधुद्रोह न होऊं देण्या- बद्दल, सांगण्याचें काम कर वयाचें. आपल्या गिरणीत काम कतांना आपल्या कामांत कसूर करावयाची नाहीं, किंवा गिरणीतील कोणाही