पान:मजूर.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ११ वें.


संप!


 मुंबईस गिरण्यांच्या संपाचा धूमधडाका उठला होता ! आज अमूक गिरण्या बंद पडल्या, काल त्या गिरण्या बंद राहिल्या. अमूक हजार मजूर 'कामावरून घरी राहिले. ' गिरणीवाले ' मजुरांच्या म्हणण्याकडे-गान्हा- ण्याकडे मागणीकडे लक्ष देत नाहीत. मजुरांचा अरेरावीपणा जिव- ण्याचा गिरणीवाल्यांना आपला निश्चय जाहिर केला आहे ! कामावरून खालीं झालेले बेकार मजूर निरुद्योगीपणामुळे टोळ्या टोळ्यांनी शहरांतून फिरत असून, लोकांना त्यांच्याबद्दल भीति वाटत आहे !"
 अशा बातम्या दररोज वर्तमानपत्रांतून मोठ्या टाईपांत छापलेल्या येऊ लागल्या होत्या ! गिरण्यांचे संप ! बेकार मजुरांची शोचनीय स्थिती, बेकार मजुरांचे अत्याचार ! गिरणीवाल्यांनी आपल्या मोटारी मजुरांच्या गर्दीत घालून त्यांना दुखापती केल्या ! चवताळलेल्या मजुरांनी गिरणी- वाल्यांच्या मोटारीवरून आणि बंगल्यावरून दगड फेंकल ! बेकार आणि उपासी मोकळे मजूर दुकानें, घरें लुटण्याचा संभव आहे, सरकार योग्य बंदोबस्त ठेवीत आहे!" अशा सारखी वर्तमानपत्रांतलीं ठळक छापलेलीं वाक्यें मोठ्यानें आंरडत वर्तमान पत्रे विकणारी मुलें सर्व मुंबई हदरून सोडीत होती !
 'संप ! संप ! चोहीकडे संपाचीच भाषा ! संपाचीच चर्चा ! कोणी गिरणीवाल्यांची बाजू घेत व मजुरांना मूर्ख ठरवीत. तर कित्येक गिरणी- वाल्यांच्या अरेरावीचा उद्दामपणाला, कठोरपणाला, निर्दयपणाला लाखोली वाहात, आणि मजुरांची कीव करीत; त्यांच्या शोचनीय परि स्थितीचें यथास्थित वर्णन करून हळहळत ! कोणीं म्हणत गिरणीवा. ल्यांना - भांडवाल्यांना हार खावी लागणार. मजुरांचें म्हणणें त्यांना मान्य करावे लागणार ! तर कोणीं बोलत मजुरांनाच शरण यावें लागेल ! भांडवलवाले त्यांना अशीतशी भीक घालीत नाहींत. त्यांना मजुरांची