पान:मजूर.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १० वें.

९९


कुणास ठाऊक ! – ताई, बाळ तुझेंही कल्याण करील बरें का ? त्याच्या संबंधानें तूं मनांत हैं आणूं नकोस! एवढे बरीक करा. बाळानी तूं माझ्या रत्नुची हेळसांड करूं नका ! बाळाप्रमाणें तुह्मां दोघांवरही माझा आशि चादाचा हात आहेच ! रत्नु लहान आहे, म्हणून त्याच्या बद्दल मला जरा हें वाटतें ! ”
 बोलतां बोलतां आईच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याने तिची उशी भिजली. आज आई इतकी कां बोलली कोणास ठाऊक ! माझे गाल ओले झाले होते. आईच्या बोलण्याकडे सर्व जग विसरून जाऊन लक्ष लावून बसले होतें.