पान:मजूर.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
मजूर

ताईचा, भाईचा शत्रूच बनला होता; असेंच जर बबूताईनें मामलें तर ? अकारण जमलेल्या निर्मल मैलांचा शेवट कसा होणार? बबूताई आपल्या• शीं आपण बबूताईशी कसे वागूं ? या विचारांची लांबण डोक्यांतून कांहीं केल्या संपेना!
 आईने हांक मारली. " दादा गेला ना ग १ " म्हणून विचारलें. मी संचित मनानें इकडून तिकडे तिकडून इकडे, बाहेरून आत आंतून बाहेर करीत होतें. आईजवळ बसावें. तिचे पाय चेपल्यासारखें करावें. तिथून उठून बाहेर गॅलरीत जाऊन बाहेरच्या सडकेच्या गर्दीकडे, क्राफर्ड मार्के- टाकडे, व्हिक्टोरिया स्टेशनच्याकडे, मुंबई कार्पोरेशनच्या अगदी इंग्लंडच्या इमारतीच्या धर्तीवर बांधलेल्या इमारतीकडे नाहींतर फोर्टकडे - पोरा फौरन, टेलिग्राफ ऑफिस, हायकोर्ट, यांकडे जाणान्या रस्त्याकडे पहात रहावें; मन गुंतविण्याचा प्रयत्न करावा, मोटारी, व्हिक्टोरिया, सायकली, ट्रॅम, याकडे पहावें. तिथंही मन रमूं नये. पुन्हां आंत यावें. असें माझें एकसारखे चाललें होतें. आईकडे पाहिलें, तर बाह्यता तरी तिच्यात कसली चलबिचल दिसत नव्हती ! शांत-धीर-गंभीर आणि समाधानी अशीच तिची वृत्ति दिसे. मला वाटलें, दादावर खूप रागावून चडफडून आरडाओरड करून पाय आपटून मॅनेजर गेला, त्याचा परिणाम आईवर कांहीं झाला असेल ? पण त्याचाही मागमूस लागला नाहीं, माझ्यानें रहावेना म्हणून मी आईजवळ जाऊन बसून तिला विचारलेंच, "आई, दादाचेंनी आपले कसें होईल ? "
 काय व्हायचे आहे.! चांगलेच होईल ! बाळ अगदी स्वारीसारखा महत्वाकांक्षी आहे. त्याच्या आयुष्यांतली महत्वाची हीच वेळ आहे. स्वारीचें लक्ष त्याच्यावर होतें. पुरुषांना साहस केलेच पाहिजे. आणि बायकांनी प्रेमळपणानें त्याला उत्तेजन दिले पाहिजे. आम्ही आमच्या क्षुद्र लाभाकरितां, आणि एवढ्या तेवढ्या ऐष आरामाकरितां पुरुषांचे पाय मागें ओढून, आपल्या घाबरेपणाने त्यांना गांगरून टाकून उप- योगाचें नसतें ! स्वारीप्रमाणे माझ्या बाळाच्या मस्तकावर माझाही हात आहेच ! बाळाचें कधीं वाईट व्हायचें नाहीं ! पण-पण त्याचे सुखाचे दिवस पहायला — स्वारी असती तर ? - मी तरी पहातें आहें कीं नाहीं