पान:मजूर.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १० वें. ९७ आहोत हें ! हा तत्वाचा प्रश्न आहे. तत्वाकरितां - पोटाकरितां प्रेमानें भांडायचे आहे हे प्रेमाचें भांडण म्हणजे आम्हां मजुरांचा संप ! दुसरें काय ? आम्हा मजुरांचा भांडून पोटाला पोटभर मिळवायचा धर्म आहे ! पोटाला भरपूर देणें गिरणीवाच्यांवें कर्तव्यकर्म आहे ! त्यांत काय विशेष आहे ? आणि तुम्हीं तरी इतके संपाला डरतां काय म्हणून १ आणि सतापतां तरी काय म्हणून ? " हे बोलतांना दादानें जी शांतता व सौम्यता धारण केली होती, ती त्याच्याजवळ नांदत असेल, अशी मी त्याची बहिण असून मला कधी कल्पना झाली नहीं. दादाच्या या विचित्र उत्तराने हो, मॅनेजरच्या दृष्टीनें दादाचें तें उत्तर विचित्रच होते- मॅनजर अधिकच चिडला " डॅम इट ! डॅम इट ! " करीत त्यानें तडक जिना पकडला. मागें देखील वळून पाहिले नाहीं. तोंडानें सारखी बडबड चालं होती ! आज दादाला त्याने आपल्या गाडीत बसायला बोलविणें शक्यच नव्हतें ! 6 मॅनेजर गेल्यावर दादानें कपडे केले. आणि जायला निघाला. निघ- तांना मात्र मला बजावलें, 'आज केव्हां येईन, केव्हां नाहीं, याचा नेम नाहीं. वेळ होतांच जेऊन घ्या. माझें वाढून ठेवीत चला. अणि आतां संप होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत असंच चालायचें आहे. माझ्या आयुष्याच्या पतंगाला आजच हवेंत गती गिळाली आहे खरी. पहायचें काय कसे होईल तें. आईजवळच ऐस. या बाष्कळाच्या बडबडीने तिचें चित्त चलबिचल झाले असेल तर गोडीगोडीनें स्थिर कर. नाहीं तर पोथी पुस्तकांत गुंतीव " असे सांगून दादाही. बाहेर पडला ! आतां हें असें रोजचेंच चालायचें होतें. पण या नव्या धामधुमीचा आज पहिला दिवस होता. आमच्या चमत्कार युगांतल्या खऱ्याखुऱ्या मह- त्वाच्या भागाला आज सुरवात होत होती ! मन घटके घटकेला निरनि- राळ्या विचारविकारांनी भरून येत होतें. प्रत्येक विकार-विचाराच्या शेवटीं मन अडे तें इथें-" आपले पुढे काय ? " दादा उघड उघड संपांत मिसळल्यावर काय किंवा मिसळण्याचें ठर- विल्यावर काय; वास्तविक जरी नसला तरी व्यावहारिक अर्थानें दादा बबू- म...७