पान:मजूर.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ मजूर सारखें करावें. मोकळें व्हावें. कशाला राहतो आहे मग संप १ तुम्हीं आणि गिरणीच्या मालकांनी मजुरांची सर्व गान्हाण जर ऐकलीं- " " नॉनसेन्स ! एक अक्षर बोलू नकोस ! मी केवढ्या आशेनें तुझ्या कडे आलो होतों. तुझ्या सारखा हुषार, चलाख, तरतरीत तरुण पहिला, हातांशीं धरावा म्हटलें, पण तू इतका भकलेला असशील याची मला काय - कल्पना ? जा, तूं आणि तुझं नशीब ! मी काय करणार ? माझ्या आणि शेटजांच्या विरुद्ध उठून संपवाल्यांना मिळून, चिथावून, खात्या घरचे वांसे मोजणार- आपल्याच हातांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहेस खुशाल घे ! - अगदी सांगून सवरून माझें शत्रूत्व संपादन करतो आहेस - माझ्याशीं गांठ आहे, लक्षांत आहे ना ? तुझें अगर्दी नक्की ठरलें ? नक्की ठरलें ? त्रिवार विचारतों ! स्पष्ट विचारतों, स्पष्ट उत्तर दे ' ठरलें नक्की ? कां माझ्या मागे येणार ? माझ्या चांगूलपणाच्या छत्रा- खाली राहून आपले कल्याण करून घेणार ? " सॉरीसाहेब ! " मी माझ्या बाबतीत एकदां जे ठरविलें तें ठरवि- लेंच ! साहेब, हा प्रश्न माझ्या एकटघाचा नाहीं. आणि मी एकटघा- करितां पुढेही आलों नसतों. पण ज्या माझ्या मजुर बांधवांच्या पाठीवर संपाची भाषा बोलण्याबद्दल फटके देणार आहां, त्यांच्या पोटाचा हा प्रश्न आहे- शिवाय तो न्याय्य आहे. म्हणून अगदी नाइलाजाने तुमचा अनुयायी होतां येत नाहीं. अशा वेळी मला मोठे होण्यापेक्षां धाकटेंच व्हावेंसें वाटतें ! - " दादानें पण तितक्याच खणखणीत शब्दांत सडेतोड उत्तर दिलें ! " ठीक आहे ! तुझ्या माझ्या बरेपणाचा हाच तर शेवटचा रामराम ! आतां तू आपल्या मार्गाला, मी माझ्या रस्त्यानें जाईन ! पश्चातापाची वेळ आली, तर मात्र मला विसरू नकोस ! माझ्याकडे ये ! आणि माझी खात्री आहे कीं, तूं माझ्याकडे येशील ! माझ्याखेरीज तुला सत् ना गत आहे. लक्षांत ठेव ! " मॅनेजर पाय आपटीत म्हणाला. " होय साहेब ! मजुरांच्या इच्छेप्रमाणे आपण केलेत व करविलेंत तर आम्ही जवळ आहोतच कीं तुमच्या ! जातो आहोत कुठें ? तुमच्या- शिवाय आम्हांला खरोखरच सत् ना गत आहे ! आम्हीं कबूलच करतों