पान:मजूर.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजूर यचें तात्पर्य असे आहे कीं, हा घरोबा टिकवायची, आणि वाढवायची संधि तुला अनायास आली आहे ! शेटजींना मी सांगेनच तुझ्याबद्दल ! तुझ्या कडून संपांत शेटजींच्या बाजूनें कामगिरी करवितों, आणि शेटजींना तुझ्या मुर्तीत आणून सोडतों, आहेस कुठें तूं! मजुरांचे इन्स अॅन्ड आउटस एवढ्याकरितां तुला कळायला पाहिजेत. म्हणून त्यांच्या सभांना तूं हजर राहिले पाहिजेस, असें माझं म्हणणं आहे ! काय समजलास १ - " " सगळे ऐकले साहेब, आणि समजलेंही!" मॅनेजर बोलायचें थांबल्यावर दादानं सुरुवात केली. मॅनेजर बोलत असतां जरी त्याच्या- कडे लक्ष होतें, तरी जेवणही झपाटयानें त्यानें चालविलेच होते. आतां त्याचा शेवटचा भात संपला होता. रत्नु मॅनेजरच्या रूपाला पहिल्या- पासूनच भीत असल्यामुळे तो आल्यापासून इकडे तिकडे न पाहतां, भरभर जेवण आटपून तूपचूप आईच्या पाठीमागे आपली पार्टी घेऊन मी दिलेला नवा धडा गिरवीत जाऊन बसला होता ! मॅनेजरचें माझ्याकडे आज विशेष लक्ष दिसत होतें. दादाचें लक्ष नहीं असे पाहून मॅनेजर आज माझ्याकडे अशी खोचक आणि शोधक दृष्टी लावी कीं, विचारूं नका ! दादानें त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. माझ्या विषयांची त्याची निराशा झाली होती, मग याची अशी खोचक अणि अंतर्भेदी दृष्टी का ? मी एक दोनदांच त्याच्याकडे सलक्ष पाहिलें होतें. एकदां तर त्याच्या तीव्र रोखाला मी भ्यालें ! त्याचा हेतु मात्र कांहीं ध्यानांत येणे शक्य नव्हतें ! आतांचे त्यानें लांचच लांब लेक्चरवजा भाषण केल्यावर दादाप्रमाणे पुन्हां एकदां माझ्याकडे विजयी मुद्रने पाहिले. त्या पाहण्याचा अर्थ मी एवढाच घेतला कीं, 'कसा मी तुझ्या भावाला प्रौढ उपदेश करून मोठेपणाच्या पदवीला नेलें आहे आणि नेणार आहे ! " असो. " साहेब, " दादा थोडा वेळ थांबून बोलू लागला, " मी आपले म्हणणे सगळे ऐकून घेतले आहे. तें पूर्ण ध्यानांतही आहे ! काल मजु- रांच सभेला गेलों होतों, आज जाणार आ आणि आणखी जितक्या सभा होतील तितक्यांना मला हजर अव्वल अखेर राहण्या- शिवाय गत्यंतर नाहीं ! पण आपल्याला अगोदरच नम्रपणानें सुचवावयाचें