पान:मजूर.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १० वे ९३ Su ' संतृ, तूं जरासा विचित्र माणूस आहेस. दुसऱ्या चें- निदान माझें ऐकत नाहींस. त्यामुळे माझा नाइलाज आहे. सतु, you have no idea about my heart, and you dont no how I lone you ! पण तूं धर्मेडीने मला फार दुखवितोस !" असे म्हणून आपल्या बोलण्याचा परिणाम दादावर, आणि माझ्यावरही काय होतो, हे पाह- ण्यांत त्यानें चारदोन मिनिटे घालविलीं ! मॅनेजरची लेक्चरबाजी कशासाठी होती, हें दादाला समजलें. माझ्या ध्यानांत आलें. तो तर जाणूनबुजूनच बोलला होता ! त्याच्या अपेक्षेचें अनुकूल उत्तर त्याला आम्हां दोघांच्याही चेहऱ्यावर मिळाले नाहीं. त्यामुळे किंचित् चेहरा बदलला. पण लगेच त्यानें तो विषयच सोडून दिला. लगेच मध्ये झाले हे कांहींच नाहीं, अशा प्रमाणे कॅनेजर मूळ पदावर गेले " संतू, आपल्याला कांहीं काळजी नाहीं. आपल्या गिरणीच्या मजु- रांना आपण संप करूं देत नाही. त्याची काळजीच नको ! आपले शेटजी गडबडले आहेत. पण मी त्यांना स्पष्ट सांगून ठेविलें आहे की, आपण निश्चित असा. मी संप होऊं देत नाहीं. आपल्या गिरणीतल्या मजुरांना ‘संपाची नुसती भाषा तर काढू द्या ! की दाखवितों एकेकाला मारे पाठीची चामडी लोळवीन ! दोन दोन महिन्याचा पगार बुडवीन ! आणि दहा तासांच्या ऐवजी बारा बारा तास काम चोपून घेईन !-अशी दह- शत घालतों म्हटलें कीं, ज्याचें नांव तें ! - सप न होऊं देण्याची रिस्पां- सिबिलिटी माझ्यावर मी घेतली आहे ! काय समजलास ? -" मॅनेजरांनी उच्चस्वरांत गर्जना केली ! " आणि, आणखीं सांगतों तुला, या वेळीं तुझ्या साह्याची मला विशेष जरूर लागणार आहे. तूं माझ्या पाठीवर ऐस. संपाची भाषा बोलणाऱ्यांना ऐसे चोपून काढूं या-शेटजींच्या घरीं तुझा घरोबा चांगला जमला आहे. प्रेमचंदभाई तुला आतां चांगले मानतात. माझ्याजवळ मी त्यांच्या इथे एकदां दोनदां गेले असतांना तुझ्याबाबत चांगले उद्गार काढले होते, त्या दिवशी प्रेमचंदांनीं तुला आपल्याबरोबर भाई या नात्यानें बसवून घेतलें, आणि तूंही छाती- ठोकमणानें बसलास - आपल्याला तुझें कौतुक वाटले ! तुला मला सांगा-