पान:मजूर.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ मजूर आरोळ्या ठोकीत दाराजवळ येऊन धडकली. दार उघडलें. मॅनेजर आंत आले ! माझ्या आणि दादाच्या कपाळाला आठ्या चढल्या ! "हं, संतू, " मॅनेजर आपण होऊनच आसनाची वाट न पाहतां दाराजवळच्या खिडकीत उडी मारून बसत म्हणाला, 66 काय कालच्या परळच्या मजुरांच्या सभेचा पोरखेळ काय - रिपोर्ट सांग मला. काल तुं गेला होतासच ! ” " होय गेलो होतों साहेब ! -" दादा उत्तरला. 66 शेवटपर्यंत होतास का १ – आजच्या सभांना जाणार आहेस ना ? जा, जरूर जरूर जा. पाजी लोक ! काय पाजीपणा करताहेत-बोलताहेत, हे आपल्याला सगळें माहिती पाहिजे. जरूर तर त्याचे लेखी रिपोर्ट घेऊन चल ! समजलास ! " दादाला आज्ञा दिली. " तें करणारच आहे मी ! " दादानें सांगितलें. आजचा दादाचा सौम्यपणा मॅनेजरसारख्या चाणाक्षाच्या ध्यानांत यायला अशक्य नव्हते. " कायरे संतू " मॅनेजरनें पृच्छा केली. “ तूं आज विशेष सभ्य दिसतो आहेस ? नेहमीसारखा ऐसपैस बोलत नाहींस ! काय आहे हें ? " " कांहीं नाहीं साहेब ! परिस्थितीचा विचार करतों आहें ? " दादानें उत्तर दिलें, कुणाच्या परिस्थितीचा ? " मॅनेजरनें भिवया चढवून, आणि नाक मुरडून प्रश्न केला. 66 “ आम्हां मजुरांच्या !" दादानें पहिल्या इतकचि शांतता ठेवून उत्तर दिलें. + " म्हणजे ? तूं मजुर कुठे आहेस ? तुझी आतां मागली स्थिती मी ठेविली नाहीं !' छाती वर करून, मान बगळ्यासारखी ताठवून मॅनेजरने प्रौढी मिरविली ! " खरें आहे तें साहेब ! मी इतक्यांत तरी तें विसरणार नाहीं ! " दादाची शांतता कायमच होती.