पान:मजूर.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १० वें.

९१


तरी सध्यां तरी काय कमी हाल भोगावे लागत आहेत म्हणा ! पण सुगंधेचें, रत्नाचें कसें होईल, त्यांना कसे निभेल, याची थोडी काळजी वाटते आहे. दुसरें काय ! होईल पण त्याचें कही ? तूं जर कांहीं चुकीनें, महत्वाकांक्षनें, इषेने द्वेषबुद्धीनें कांहीं करणार नाहींस, तर देव तरी त्याची उपेक्षा कां करील?"
 म्हातारीचा कंठ बोलतां बोलतां दाटून आला ! माऊलीचें अंतःकरण तें ! बिचारी माझ्या आणि रत्नुच्या मध्यान्हींच्याबद्दल कष्टी होते आहे. पण स्वतःबद्दल–अगदीं मृत्यूशय्येवर लोळत असतां, कसे होईल, आपल्याला खायलाप्यायला कसे मिळेल ? याबद्दल बिचारीने ब्र काढला नाहीं. दादाबद्दलही तिच्यानें बोलवेना ! हें बोलतांना, माझ्याबद्दल आणि रत्नुबद्दल बोलतांना आईचा जसा कंठ दाटून आला होता, तसेच दादा- लाही अगदीं गहिंवरून आलें होतें.
 'जा, कांहीं कर. तुझ्या हातून चांगलेच होईल. जे करायचें तें पूर्ण विचारानें कर म्हणजे झालें. माझा तुला आशिर्वाद आहे. ईश्वर तुझें मंगल करील ! " एवढेच आईचे शब्द ! पण त्यांनी, आई, दादा, मी यांचे मनःसागर नुसते हलून गेले होते ! तिघांच्या नेत्रांतून सारख्या अश्रु- धारा वाहात होत्या ! तिघेही तिघांशी बोलत नव्हतों की एकमेकांकडे पाहण्याचे धाडस करीत नव्हतों ! प्रत्येकाला वाटत होतें कीं, आपल्या- करितां पुढे कालचक्रानें जबरदस्त वाढून ठेविलें आहे, तें सुख आहे कीं दुःख आहे, यश आहे कीं अपेश आहे, याचें कुणालाच ज्ञान असणें शक्य नव्हतें. पण आपल्याला-दादाला ज्या मार्गानें जावें लागणार आहे, तो मार्ग तरी बरोबर आहे कीं, चुकीचा आहे याचा तरी नक्की अंदाज कुणाला होता ?
 तरीपण भावी कार्याकरितां दादाला आईचा प्रेमळ आशिर्वाद मिळाला होता. आई समाधान वृत्तीनें निश्वास सोडीत होती. तर दादाच्या चेह- प्यावर सात्विक उल्हास झळकत होता !
 माझा स्वयंपाक झाला. मी पाटपाणी केलें. दादा आणि रत्तू जेवा- यला पाटावर येऊन बसले. अगदी हीच वेळ. खुशालचंदची स्वारी जिन्यावरून दाणादाण पाय आपटीत आणि'संतु,संतुराम'अशा