पान:मजूर.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १० वें.


दादाला आईचा आशिर्वाद.


 दादाला आज विशेष गडबड होती. मजुरांच्या सभा संध्याकाळीं गिरण्या सुटल्यावर दोन तीन ठिकाणी व्हायच्या होत्या. सर्व सभां दादाला हजर राह्यचें होतें. म्हणून दादानें मला रोजच्यापेक्षां लवकर उठविलें होतें. गिरण्यांचे ' सप' वगैरे व्हावयाचे आहेत, इथपर्यंत रात्रीं आईनं घुरमळतां घुरमळतां ऐकलें होतें. त्याबद्दल आईनें दादाला सकाळीं विचारलेच. दादानेही तिला शक्य तितक्या साध्या, सोप्या, शब्दांत सर्व परिस्थिति समजावून देण्याचें चालविलें होतें. दादा सांगत असतां आई मध्यें कांहींही बोलत नव्हती. तिचें नुसतें 'हं, हं, ' एवढेच चाललें होतें आईच्या अंतःकरणाला दुखवेल, तिची भलतीच कांहीं समजूत होऊन धक्का बसेल आणि तिच्या प्रकृतीवर अ णखी परिणाम होईल याकरितां जें सांगावयाचें तें कसं काय, याकरितां दादा अतिशय सावधगिरी ठेवीत होता. तरी पण दादाच्या आजवरच्या वागण्या बोलण्यांत आणि आजच्या वागण्या बोलण्यांत फार फरक पडला होता. आजचा दादा निराळाच दिसत होता. दादाला जेवढे सांगावयाचें होतें, तेवढे सांगि- तल्यावर किंवा आईला जेवढे दादापासून समजाऊन घ्यावयाचें तेवढें आईने समजाऊन घेतल्यावर आई अगदी निश्चल आणि शांत मनानें म्हणाली कीं,
 "बरं तर ! जसे दिवस येतील तसेही काढले पाहिजेत. हे असे दिवस वाटयाला येतील असें कधीं कुणाला वाटलें होतें ? आलें नशि- बाला भोगतोंच आहोंत कीं नाहीं ! बाळ, तूं कांहीं केलेंस, कसाही वाग- लास तरी माझें म्हणणें नाहीं. मला पुरतें माहीत आहे कीं, कधीही, आणि केव्हांही अनुचित, आपल्या कुलाला, शीलाला, लांच्छन आणील असें कांहींही व्हायचें नाहीं ! आपणां सर्वानाच यामुळे या संपाच्या वावटळीत सांपडलास तर पोटापाण्याचे हाल भोगावे लागतील. - नाहीं