पान:मजूर.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ९ वे

८९


दादाचे विचार होते कीं, त्यापेक्षां निराळे होते, आणि माझ्याच प्रमाणें दादाही गडबडून गेला होता; हें माझ्या या मनाच्या स्थितींत अजमावतां येणें शक्य नव्हतें ! दादाच्या बुद्धीची शक्ति अजमावणें पुष्कळ प्रकारानें माझ्या अटकेबाहेरचें होतें !
 पुष्कळ वेळाने मी घोगऱ्या पण खालच्या आवाजांत म्हणाले, "दादा, कांहीं झालें आणि कांहीं म्हटलें तरी, आजच्या आपल्या परिस्थितीच्या मानानेही संकटांची आपल्याकडे वळणारी पाउलें हेंच रुरें !
 "संकटांची पाउलें तर खींच ! " दादाचा या वेळीं गंभीर आणि निश्चयी आवाज ऐकून तशाही स्थितीत माझ्या अंतःकरणांत अननुभूत अशा श्रेष्ठ प्रतीच्या संवेदना झाल्या ! ज्याला मोठे व्हायचे आहे, त्यानें या संकटांच्या पावलांना भिऊन, आणि पाठ दाखवून भागायचें नाहीं ! मोठे होणारानें, आपलें, आणि दुसऱ्या चें- आपल्या बरोबरीच्याचे कल्याण करूं पाहणारानें, असल्या संकटांची पाउलें वाजलेली ऐकावयाचें म्हणजे, आपल्या कर्तबगारीला, कर्तव्याला, जीवितसार्थक्याच्या संधीला, अवसर दिला गेला आहे, असेंच समजलें पाहिजे ! "
 "कांहीं कर ! पण आईच्या आशेबाहेर कांहीं करूं नको ! " मी सुचविलें.
 आईचा आशिर्वाद, ईश्वरी प्रेरणेच्या आड खचित यावयाचा नाहीं ! मी जर संपांत सदिच्छेने, न्यायबुद्धिनें, सत्याच्या सिद्धीसाठींच पडलों तर आईचा आशिर्वाद कां मिळणार नाहीं ? " दादा एवढेच म्हणून गप्प बसला होता. या वेळीं आम्हीं दिवा मालविला असून, आपापल्या अंथ- रुणावर पडूनच बोलत होतों- आईची झोप आमचा वादविवाद चालू असतांच लागली होती !
 नंतर आम्हीं कांहींच न बोलतां, आपल्या घरी भावी स्थितीचा विचार करीत व झोपेची आराधना करीत स्वस्थ पडलो. दादाची केव्हां झोप लागली समजलें नाहीं. मला मात्र लवकरच झोपेनें घेरलें. पण झोपेंत सीनेमा फील्म प्रमाणे, 'दादा, मॅनेजर, भाई, बहुताई, बबूताईचा बंगला, गिरणी - संप-" यांचीच सारखीं स्वप्ने पडत होती !!