पान:मजूर.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
मजूर


 "पगारवाढी साठीं बोनससाठीं आणि कामाचे तास कमी होण्या- साठीं ! " दादाने माहिती दिली.

 "मग रे ? मग तूं काय करणार ? तुला आतां बढती मिळाली आहे. तूं कांहीं मजूर नाहींस !"मी हलके हलके एकएक शब्द उच्चारला !
 "नाहीं ताई, मी मजूरच आहे ! माझ्या बढतीची काय प्रतिष्ठा आहे ? मजुरांच्या हितासाठी मजुरांच्या कायमच्या कल्याणासाठी मी नुकत्याच मिळालेल्या बढतीवर लाथमारून संपांत सामील कां होऊं नये ? - याचा विचार करतों आहें, आज परळच्या प्रचंड मजुरांच्या जाहिरसमेत मजुरांच्या बाजूनें जे मुद्दे पुढे आले आहेत, ते खरोखरच विचार करण्यासारखे आहेत, असें माझें मत आहे ! आणि मी जसजसा त्या गोष्टींचा विचार करूं लागलों आहें, तसतसा मजुरांनी एकवटून संप करून आपली दाद लावून घेतलीच पाहिजे - मजुरांचा सत्पक्ष आहे असंच माझें ठाम मत बनत चाललें आहे ! " दादाचा यावेळी चेहरा इतका निराळा दिसत होता, कीं ओळखू न येण्याइतका त्यांत बदल झाला होता. बोलतांना त्याच्या नाकपुडया फेंदारल्या होत्या श्वास जोरानें चालला होता. आणि माझ्याशीं जरी एकेक-तुटक- मुद्देसूद रीतीनें शब्दाची योजना करून बोलत होता, तरी त्याचें लक्ष कुठे तरी गूढ-अतीशय गूढ विचारांत गुंतलें होतें, असें दिसलें.
 मी तर दादाच्या सांगण्य नें दिङ्मूढच झालें होतें. माझ्या डोक्यांत अनेक चांगल्या वाईट विचारांची सारखी धांवपळ चालली होती ! एकं दरीत आल्यावर येणाऱ्या संकटांचीं पावलेंच मलाव दूं लागली. दादानें संपांत शिरायचे म्हणजे संप संपेपर्यंत खायचे काय ? आई अजारी-रत्नु लहान - कुंटुंब च्या पोषणाची तजवीज काय करावयाची ? माध्यान्हीची वेळ कभी भागवावयाची ? दादा संपांत शिरणार-बबूताईला, भाईला, काय वाटेल ? आमच्याविषयीं त्यांची सहानुभूति, सलोखा, स्नेह, वाढत चालला आहे, त्याची काय वाट व्हावयाची ? माझ्या मागणीबद्दल दादाने मॅने जरला नकार दिला आहे. तो दुष्ट चिडला असेल, तो काय करील ? एक ना दोन ? हजारों विचारांनी माझ्या मस्तकांत काहूर - थैमान चाल- विलें होतें ! दादा शांत होता. मी शांत होतें. माझ्याच विचारासारखे