पान:भूमी आणि स्त्री.pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजतरी साचेबंद चौकट नाही. किंबहुना कुमारिकाउत्सवात ती जाणवत नाही. वेदकाळात अन्नसमृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना गायिल्या जात. उपनिषदातच 'उदगीथ' अन्नसमृद्धीची गाणी आहेत. या प्रार्थना प्राथमिक अवस्थेतील मानवाने यातुविधींच्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या स्वरसमूहांचे उन्नयन झालेले रूप असावे असे मानले जाते.
 समाजव्यवस्थेच्या मुळाशी अर्थव्यवस्था -
 धर्मानंद कोसंबींच्या मते शेतीचा शोध आणि मातृसत्ताक समाजव्यवस्था यांची निर्मिती प्रथम भारतात आली. प्रो. ऱ्हेनेफेल यांच्या मते मातृसत्ताक जीवनपद्धती भारतात होती. मातृसत्ताक वा पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या मुळाशी त्या समाजाची अर्थव्यवस्था असते. मातृसत्ताक जीवनपद्धती अस्तित्त्वात असताना स्त्री ही अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होती. जीवनव्यवस्था कृषिप्रधान होती. 'दुहिता' या शब्दाचा दोहन करणारी ती. या शब्दाला पुल्लिंग नाही. असाच आणखीन एक शब्द म्हणजे 'वयन्ति' म्हणजे विणणारी. महाभारतात धर्मराजाने राजसूय यज्ञ केला तेव्हा गावातील लोकांनी यज्ञात सहभागी व्हावे यासाठी फतवा काढला. सैनिक पाठविले. त्यावेळी जरद्गवा नावाची स्त्री यज्ञात सहभागी होण्यास नकार देताना सांगते की, 'माझी गव्हाची शेते भरात आली आहेत. घरात लोणी साठले आहे. ते मला विकण्यास जावयाचे आहे. ते अधिक महत्त्वाचे आहे'. यावरून असे लक्षात येते की स्त्रियांचा उत्पादनात, अर्थव्यवस्थेत जोवर सहभाग होता तोवर समाजातही त्यांना महत्त्व होते. नांगर, चाक आदी यंत्रांचा शोधा लागला, भारतावर होणारी आक्रमणे वाढली, पितृसत्ताक जीवनपद्धती दृढ होऊ लागली आणि आमूलाग्र बदल झाले. स्त्रीचे मौंजीबंधन होऊन त्यांनतर दिले जाणारे शिक्षण थांबले. उत्पादनातील तिचा प्रत्यक्ष सहभाग थांबला. पैतृक वारशाचे नियम स्थिर झाले. जातीय व्यवस्था दृढ होताना मातृसत्तेची पाळेमुळे निघृणपणे खणून काढली गेली असावीत. ती नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्न केले असावेत. त्यातूनच बालविवाह बहुपत्नित्व सतीची चाल यासारख्या दृष्ट रूढी आल्या असाव्यात. प्रो. ऱ्हेनफेल यांच्या मते हा संघर्ष एकूण जगातील मानवी संस्कृतीत आढळून येतो.
 पूर्ववैदिकांच्या काळातील स्त्रियांबद्दल असलेली सन्माननीयता नाहीशी झाली. स्त्रीला सर्वाधिकारांपासून वंचित करण्याचे काम नियमबद्धपणे केले गेले असावे. कारण

९०
भूमी आणि स्त्री