पान:भूमी आणि स्त्री.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आली आहे. श्रीकुमाराने "शिल्परत्नात' क्षणिकचित्र असा उल्लेख केला आहे. भारतीय संस्कृतीत रांगोळी अशुभनिवारक मानली जाते.
 आदिमानवाने अन्नसमृद्धीसाठी यातुविधी केले. त्यावेळीही मांडणी, विशिष्ट क्रिया यांना विशेष महत्त्व असावे. त्यातून ही कला विकसित झाली असावी. ज्यांच्यावर गर्भधारणा, मातृत्व या नैसर्गिक जबाबदाऱ्या पडलेल्या नाहीत, अशा कुमारिकांनी या कलेलायोगदान दिले असावे, समृद्ध केले असावे.आजही अंगणातसडा घालून रांगोळी काढण्याचे मंगलागौर, हरतालका आदिपूजेच्या वेळी चौरंग पानाफुलांनी सजवण्याचे काम मुलीच करतात. श्रावणाच्या सदाप्रसन्नवातावणाचे वर्णन करताना बालकवी लिहितात -
  सुंदरबाला या फुलमाला
  रम्य फुले पत्री खुडती....
 हीअभिव्यक्ती भारतीय जीवनपद्धती मधील कुमारिकांचे प्रसन्न आणि महत्त्वाचे स्थान सहजपणे व्यक्त करते. कवीच्या प्रतिमांतून लोकमनाच्या अंतरंगातील आदिबंध सहजपणे व्यक्त होतात. हे खरेच.
 कुमारिकांच्या उत्सवांतील मूलबंध -
 गणगौर, तीज, भोंडला, भुलाबाई, भराडी गौर, सांझी, मामुलिया बदकम्मा, कोलवू ही सर्व भारतीय व्रते कुमारिकांची आहेत. व्रते म्हणण्यापेक्षा कुमारिका उत्सव म्हणणे अधिक योग्य होईल. व्रत कल्पना ऋग्वेदात आढळते. वृ म्हणजे निवडणे या धातूपासून व्रत शब्द तयार झाला. व्रत म्हणजे विशिष्ट काळासाठी वा आमरण आचारावयाचा नेमधर्म. अमरकोशात व्रत आणि नियम हे शब्द समानार्थी आहेत तर 'मिताक्षरा' नुसार व्रत म्हणजे काही आचरण्याचा व काही न आचरण्याचा निश्चय. व्रतात आरंभ, संकल्प, पूजा, उपास, दान, जागरण यांना महत्त्व असते. राजस्थानात तीज, गणगौर या कुमारिकाउत्सवाचे उद्यापन केले जाते. त्यानंतर त्याची सांगता होते. तसे भोंडलाभुलाबाईच्या बाबतीत आज तरी सांगता समारंभ अस्तित्वात नाही. परंतु
  अंकणा तुझी सात वर्षे
  भोंडल्या तुझी सोळा वर्षे
या ओळीवरून या उत्सवाचे पूर्वी व्रतस्वरूप असावे असे वाटते. भोंडलाभुलाबाईची

भूमी आणि स्त्री
८९