पान:भूमी आणि स्त्री.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'न्हाणुली' विवाहिता असे व पहिल्या न्हाणानंतर काही दिवसांतच पती पत्नींची पहिली भेट घडविण्याचा विधी केला जाई. या विधीशी संबंधित गाण्यातही तसे संदर्भ आहेत.
 नहाण -
  वेणीमधे हिरवाची मरवा
  की आणू केवडा सांग सखे
  तू बनलीस मृगनयनी॥
  हिरवा करूनिया साज
  नेसलीस पैठणी
  अंगी तंग चोळी
  तू माझी मृगनयनी॥
  पाचूची अंगठी,
  हिरव्या जडिताची चिंचपेटी
  गोठ पाटल्यांची दाटी
  असे तू मृगनयनी॥
  हिरवे पानदान
  पानपुडा चुना बरवा
  अडकित्त्याचा रंग हिरवा ।।
  हिरव्या जडिताचा पलंग करवा
  हिरव्याच गाद्या हिरव्याच उशा
  छतावरी रंग हिरवा ।।
 गोरी मालन -
  गोरी मालन : अशी कौतुकाची वेळ
  पहिल्या दिवशी पुसावी चौकट
  दुसऱ्या दिवशी गोऱ्या मालनीला मांडावा चौरंगपाट

६२
भूमी आणि स्त्री