Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  तिसऱ्या दिशी सोनाराला गेली चिठ्ठी
  गोऱ्या मालनीला चांदीची ताट वाटी
  चौथ्या दिशी सासू करते चौरंगपाणी
  गोऱ्या मालनीची माता तिची वंटी आणी
  पाचव्या दिशी कासाराला गेल पत्र
  गोऱ्या मालनीच्या चुड्याला झाली रात्र
  सहाव्या दिवशी अंगणी उभे माळी
  मालनीच्या मखराला कंबळ सरश्या केळी
  सातव्या दिशी होमाचा होतो धूर
  देवकृष्ण नाथ कोमेजला चंद्र नूर
  आठव्या दिशी आठ आठ गोळा करा
  गोऱ्या मालनीच्या गोताला मूळ धाडा
  नवव्या दिवशी सई माडीवर जाते
  गोरी मालन गोताची वाट पाहती
  दहाव्या दिशी सरी कंठ लेप लेयीली
  गोऱ्या मालनीला कुणाची ग दृष्ट झाली
  गोरी मालन कृष्णाला देते विडा
  अशी कौतुकाची वेळ कृष्णनाथ वंटी घालतो नारळ
      वंटी घालतो नारळ ॥
 ऋतुशांती -
 अलीकडे ग्रामीण भागातील मुलींचे विवाह ऋतुमती झाल्यावर दोनतीन वर्षांनी होतात. ऋतुमती झालेल्या मुलीच्या विवाहानंतर सासरी गेल्यावर तिची ऋतुशांती केली जाते आणि त्यानंतर पती पत्नीच्या मिलनास संमती मिळे.
 धर्म, विज्ञान यांचे मूळ 'जादू' -
 डॉक्टर रा.ना. दांडेकर म्हणतात "देव, मानव, पशु आणि विश्वातील इतर वस्तू या सर्वात यात्वात्मक रज जेवढे जास्त तेवढे त्या वस्तूत बदल अधिक. असु ही शक्ती सर्वव्यापी मानली जात असे. याच शक्तीला वैदिक 'माया' म्हणतात. फ्रेझर हा लोकविद्या, मानवविकाससंबंधीत शास्त्रांचा थोर अभ्यासक म्हणतो की

भूमी आणि स्त्री
६३