Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्माण होतो. पुरुषाचे स्थान केवळ प्रकृतीला 'भेटणारा' एवढेच आहे. पिता हा निमित्तमात्र म्हणजे जन्मदाता, एवढेच मानले आहे. तांत्रिकांच्या मंत्रतंत्रादी आचारावर भर असलेल्या कर्मकांडांतून बाहेर पडून सांख्यांनी त्याला नैतिक अधिष्ठान दिले.
  'माता' पूजनीय पण स्त्री? -
 एकूण भारतीय संस्कृतीत 'माता' पूजनीय असली तरी 'स्त्री' म्हणून तिला समाजात दुय्यम स्थान आहे. 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति' 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियासि' यासारखी वचने वैदिक वाङ्मयात आढळतात. पण दुसऱ्या बाजूला १७'स्त्रीशूद्रौनाधीयाताम्' स्त्री व शूद्रांनी अध्ययन करू नये हा नियम घालून दिला. किंबहुना 'स्त्रीशूद्र' असा द्वंद्व समाज रूढ करून दोघांना समान नियम लावले. मनू म्हणतो, 'स्त्रीशूद्राश्च सधर्माणः' बोधायनसूत्र सांगते, शूद्राच्या हत्येसाठी जे प्रायश्चित्त आहे तेच स्त्रीच्या हत्येसाठी आहे. स्त्रिया आणि शूद्रांनी विष्णु किंवा शिवलिंगास दुरून स्पर्श न करता वंदन करावे. या दोहोंनी स्पर्श केलेल्या लिंगाची वा मूर्तीची पूजा करणाऱ्याची कोटी कुले नरकात पडतील. त्यांना पूजेचे फळ हवे असल्यास ब्राह्मणाकडून पूजा करावी असे निर्णय सिंधू सांगतो. आणि पुराणे ही स्त्री शूद्रांसाठी दयाबुद्धीने तयार केली आहेत असे देवीभागवतात म्हटले आहे. स्त्रियांची निंदा एकूणच ग्रंथांतून विविधप्रकारे केली आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वात म्हटले आहे 'क्षुरधारा विषं सर्पो वाह्निः इति एकतः स्त्रियः' वस्तऱ्याची धार, विष, साप आणि अग्नी हे सर्व एकत्रितपणे स्त्रीमध्ये आढळतात. कथा सरित् सागरातील अनेक सुभाषितांतून स्त्रीनिंदा आहे. उदा. स्त्रियांच्या ओठात अमृत पण ओटीत मात्र विषच असते. 'स्त्रियःश्चरित्रपुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः ?' हे वचन प्रसिद्ध आहे. एका कवीने तर मृत्यूच्या चार दारांपैकी एक 'प्रमदाजनविश्वास' स्त्रियांवरील विश्वास हे सांगितले आहे (पूर्वोक्त भांडागार पृ. १६९ श्लोक ८९) एकूणच स्त्रिया अविश्वसनीय, गूढ, चंचल, घातक, कठोर, धूर्त, चरित्रहीन, भोगातुर, अधःपतनाचे कारण असतात अशी भूमिका वैदिक संस्कृत वाङ्मयात मांडलेली आढळते. 'आई' या पदाचा, नात्याचा गौरव केला तरी तिला (स्वामी विद्यानंद सरस्वती, वेदमीमांसा दिल्ली १९८४ पृ. २३०- २३३) अधिकार दिलेले नाहीत.

२९२
भूमी आणि स्त्री