Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. सत्तेची सूत्रे भावाच्या वा मामाच्या हातात पूर्वीपासून होती. अलीकडे 'थरवाड' कमी होऊ लागली आहेत. पत्नी पतीच्या सोबत राहू लागली आहे. मात्र एक गोष्ट विचारात घेणे महत्त्वाचे ठरते. दक्षिणेत कर्नाटकी ब्राह्मण समाजात मामाशी भाचीचा विवाह परंपरने होतो. मुंजीच्या वेळी भाचा ब्रह्मचर्याची शपथ घेऊन संसार त्याग करू लागतो तेव्हा मामा त्याला अडवतो आणि मुलगी देण्याचे आश्वासन देतो. महाराष्ट्रात आत्याच्या घरी मुलगी देण्याची प्रथा आजही आहे. मातृसत्ताक जीवन पद्धतीचे हे अंधुक अवशेष आहेत.
 माणसाचे अधिकार, त्याची कुटुंब व समाजविषयक कर्तव्ये त्याच्या वरील सामाजिक बंधने या सर्वाचे नियमन, स्त्रीकडून येणाऱ्या वारसा पद्धतीने होते तेव्हा त्या समाजपद्धतीला मातृसमाज पद्धती म्हणतात. या समाजात सण, उत्सवात पतीला विशेष मानाचे स्थान नसते. नायर कुटुंबाचे वैशिष्ट्य खालील शब्दात व्यक्त झाले आहे.
 १६The Nayar family, or Tarwad consists of a woman and her sons and daughters and so on. The son's children do not belong to that Tarwad but are affiliated to Tarwads of their wives. The property of a Tarwad is practically impartible and is looked after by the karnavan the mothers brother. Nayar women are entitled to keep more than one husband and this is only possible in a matriarcal residence where husbands are occasional visitors only..... the children have no tie with him"
 काही संशोधक असे मानतात की, सिंधू संस्कृतीतील मातृसत्ताक समाज आर्यांच्या आक्रमणानंतर सरकत सरकत दक्षिणेकडे आले. आपली प्राथमिक शेती व्यवसाय करीत राहिले. हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही त्यांच्यावर वैदिक आर्यांच्या जीवनपद्धतीचा परिणाम झाला नाही.
 मातृसत्ताक समाजाच्या जीवनव्यवस्थेत 'प्रकृतिप्रधान'ता होती. सांख्यांनी भौतिक दृष्टिकोनातून विश्वविकासाची मीमांसा करण्याचा भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न सांख्यदर्शनातून केला. प्रकृतिपुरुष विचाराला तत्त्वचिंतनाच्या पातळीवर आणून सोडले. प्रकृती हेच विश्वाचे आदिकारण असून विश्वाचा पसारा तिच्यापासून

भूमी आणि स्त्री
२९१