Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मातेला अधिकार नाहीत -
 नारद स्मृतीत म्हटले आहे, वडीलांनी स्वतःच कन्यादान करावे व जिला वडील नसतील तर भावाने, वडिलांच्या पित्याने, वडिलांच्या कुळातील पुरुषाने अथवा मामाने करावे. या सर्वापैकी कोणीच नसेल आणि मुलीची आई शरीराने वा मनाने स्वस्थ असेल तर तिने करावे. या वरून धर्मशास्त्रानी वरवर पाहता 'माता' या पदाचा केलेला गौरव किती वरकरणी आहे ते लक्षात येते. शास्त्रकारांना आईविषयी खरोखरच आदर असता तर वडिलांनंतर तिचा क्रम लावायला हवा होता. कौटिल्यानेही आईला स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. याला अपवाद एकमेव १८वराहमिहिराचा आहे. त्याने मात्र बृहत्संहितेत या निंदकांची परखड हजेरी घेतली आहे. वराहमिहिराच्या काळाबद्दल इ.पू. ३ रे शतक की इ.स. ६ वे शतक हा वाद आहे. असे असले तरी त्या एकमेव विद्वानाने अत्यन्त कठोर शब्दात, तर्कशुद्ध पद्धतीने स्त्रियांचा कैवार घेतला आहे. आपल्या बृहत्संहिता ग्रंथात तो म्हणतो, 'स्त्रियांचा असा कोणता दोष आहे जो पुरुषांच्या आचरणात आढळत नाही. विकृत आचरण करणारा पुरुष कमी दोषी आणि स्त्री आधिक दोषी असे सांगण्यात आलेले नाही. पुरुष नियमांचे पालन करीत नाहीत. स्त्रिया मात्र करतात. म्हणून त्याच श्रेष्ठ आहेत. स्त्री ही पुरुषाची पत्नी असते वा माता असते. पुरुषाचा जन्म स्त्रीपासून झालेला असतो. स्त्रियांची निंदा करणाऱ्यांना सुख कसे लाभेल?' पण वराहमिहिरासारखे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके. स्त्री कितीही चांगली वागली तरी पुरुषाचे समाधान करू शकत नाही ही भावना कवी भवभूतीने 'उत्तररामचरित' या नाटकात पात्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली आहे. तो म्हणतो, 'वाणी व स्त्रिया यांच्या शुद्धत्वावर ठपका ठेवताना लोक दुर्जनतेने वागतात, एवढेच नव्हे तर अतिदुर्जनतेने वागतात असे म्हटले पाहिजे. हे अपवाद सोडले तर धर्माची एकूण भूमिका 'स्त्री' निंदकाची आहे.
 सुफलीकरण विधीत स्त्रीच महत्त्वाची -
 स्त्रीमध्ये सुफलीकरणाची अद्भुत शक्ती आहे. भूमीचे सुफलीकरण करण्यासाठी तिचा तिच्यातील यातुशक्तीचा उपयोग करून घ्यावा हे तर्कशास्त्र कृषिविधानात वापरले गेले. झाडाचे पहिले फळ सवत्स स्त्रीला देतात. ज्या स्त्रीला

भूमी आणि स्त्री
२९३