या भक्तीच्या रूपाला 'मधुरा भक्ती' असे म्हटले जाते. प्राचीन काळी देवतांची उपासना, मंत्रतंत्र, मनुष्य व देव यांच्यातील मध्यस्थीचे व्यवहार स्त्रीकडेच होते. या आचारालाच तंत्रशास्त्रात वामाचार म्हणत. वामा म्हणजे स्त्री. 'वामा' होऊन आचार करणे. उपासकाने 'स्त्री' बनून उपासना करावी असा दंडकच होता.'वामा भूत्वा यजेत् परम्' असा नियम आचारभेद मंत्राने सांगितला आहे. तंत्रोपासनेत स्त्रीमाहात्म्य आहेच. तंत्र साधनेतील स्त्रीमाहात्म्य आणि कृषिकर्मातील मंत्रतंत्रातील स्त्रीमाहात्म्य यांचे स्वरूप समान आहे. भूमीचे व स्त्रीचे सुफलीकरण हेच या दोही 'वामाचारां' मागचे रहस्य आहे. वामा म्हणजे स्त्री, स्त्रीप्रधान विधी म्हणजे वामाचार. वामाचार म्हणजे कामाचार. शेतीविषयक मंत्रतंत्रात स्त्रीपुरुष संयोगाला यात्वात्मक महत्त्व असते. वैदिकांनी अन्न, गोधन व संतती यासाठी यात्वात्मक यज्ञ केले. यज्ञविधींमध्ये उच्चारल्या जाणाऱ्या मंत्रांना 'कामवर्षा' हे नाव मिळाले. वैदिकांच्या यात्वात्मक विधीतही स्त्रीपुरुष संयोग विधींना महत्त्व होते. परंतु त्या विधीत पुरुषांना महत्त्व असे. तांत्रिकांच्या विधीत शेतीशी संबंधित विधींप्रमाणे स्त्रीला महत्त्व असे.
भारतातील मातृसत्ता-
ऱ्हेनफेल या संशोधकाच्या मते जगातील सर्वात आधिक प्रभावी मातृसत्ता भारतात होती व तेथून ती पश्चिम व मध्य आशियात गेली. हे त्यांचे मत विवादास्पद असले तरी प्राचीन वाङ्मयात स्त्रीराज्याचे उल्लेख येतात. अर्जुनाशी युद्ध करणारी प्रमिला ही एका स्त्रीराज्याची स्वामिनी होती. ह्युएनत्संगनेही 'पूर्वेकडील स्त्रीराज्य' आणि 'पश्चिमेकडील स्त्रीराज्य' असे उल्लेख केले आहेत . तिबेटमधील न्यू बँग टोळीत स्त्रीचे राज्य होते. स्कंदपुराणात पाच लाख खेड्यांचे मिळून बनलेल्या स्त्रीराज्याचा उल्लेख आहे. मॅगेस्थेनिसने पांड्य देशातील स्त्रीराज्याची माहिती दिली आहे. पांड्य देश म्हणजेच मलबार. याभागात अगदी अलीकडेपर्यंत मातृसत्ता होती. पुराण, रामायण, महाभारत यांत स्त्रीराज्यांचे उल्लेख आलेले आहेत.
भारतात आजही नायर आणि खासी जमातीत ही प्रथा आहे. माझ्या माहितीतल्या नायर कुटुंबातील विवाहपत्रिका आईच्या नावे काढली जाते. मात्र गेल्या ४०/५० वर्षांत या समाजातही पुरुषसत्ता वेगळ्या पद्धतीने वाढू लागली
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९०
भूमी आणि स्त्री